व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडुन निषेध
जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिले तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन
वृत्तवेध ऑनलाईन । 23July 2020
By:Rajendra Salkar
कोपरगाव : खासदार छ. उदयनराजें भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उद्यराजे यांनी आपली शपथ इंग्रजी भाषेतून घेतली. शपथेबरोबर उदयनराजे यांनी ‘जय हिंद’, ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी- जय शिवाजी’, असा घोषणा दिल्या. यावर व्यंकय्या नायडू यांनी केलेले वक्तव्याचा शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करण्यात आला असून याबाबतचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, खासदार छ. उदयनराजें भोसले यांनी बुधवारी (२२जुलै) राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथेबरोबर उदयनराजे यांनी ‘जय हिंद’, ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी- जय शिवाजी’, अशा घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना ‘हे हाऊस नाही हे माझे चेंबर आहे. सदनातील नवीन लोकांना सांगतो. शपथ घेताना कोणतीही घोषणा देऊ नये, ते काहीही रेकॉर्डवर जाणार नाही. सभागृहात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या, अशी समज दिली.
व्यंकय्या नायडू यांनी केलेले वक्तव्यातून भाजपची छत्रपती शिवरायांबद्दल असलेली खोटी अस्मिता दिसून आली आहे. या घडलेल्या प्रसंग व व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. छत्रपती शिवराय होते, म्हणून आपण आज राज्यसभेचे अध्यक्ष व देशाचे उपराष्ट्रपती आहात, तसेच नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत हे भाजपला विसरून चालणार नाही असे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, विधानसभा संघटक असलम शेख, उपशहर प्रमुख कलविंदर दडियाल,शहर संघटक बाळासाहेब साळुंके, किरण खर्डे, एसटी कामगार सेना अध्यक्ष भरत मोरे, रवींद्र पवार यांच्यासहया आहेत.