राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत सद्गुरु गंगागीर कॉलेज कु. पूजा गवळी राज्यात मुलींमध्ये प्रथम
Sadguru Gangagir College Ms. in State Public Service Commission Exam. Pooja Gawli first among girls in the state
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed28 Dec22 , 18.20 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगांव: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात सद्गुरु गंगागीर महाराज कॉलेजची विद्यार्थिनी कु. पूजा बाबूराव गवळी’ हिने सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी झालेल्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले. याबरोबरच राज्य कर निरीक्षक परीक्षेतही राज्यात मुलींमध्ये नववा क्रमांक पटकवला आहे.
कु. पूजा गवळी हिचे पदवीपर्यंतचे शिक्षण भौतिकशास्त्र विषयातून एस. एस. जी.एम. महाविद्यालयातून पूर्ण झाले. शिक्षण घेत असताना महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाल्याचे पूजा गवळी हिने सांगितले. तिला मिळालेले यश विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगून रयतचे जनरल बॉडी सदस्य संदीप वर्पे यांनी या यशाबद्दल तिचा सत्कार केला. सत्कारप्रसंगी प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी इतर विद्यार्थ्यांनी पूजा गवळी हिचा आदर्श घेऊन यश संपादन करावे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील सुविधा व सुसज्ज ग्रंथालयाचा लाभ घ्यावा असे सांगून तिला शुभेच्छा दिल्या.
तिच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ऍड भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आ. आशुतोष काळे आणि महाविद्यालय विकास समिती सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
या सत्कार कार्यक्रमप्रसंगी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चेअरमन प्रा.संजय गायकवाड, डॉ मोहन सांगळे, डॉ निलेश मालपुरे, डॉ. डी.एम. सूर्यवंशी, डॉ. एच.टी. मते, डॉ. ए.बी. भागवत,डॉ. व्ही.बी. जीवतोड़े, कार्यालयीन रजिस्ट्रार . ठोंबरे, ज्यू. कॉलेज उपप्राचार्य गमे सर, कार्यालयीन अधीक्षक .सुनील गोसावी, पालक . बाबूराव गवळी,. नाना गवळी यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय गायकवाड़ यांनी केले तर आभार प्रा. डॉ. जीवतोडे यांनी मानले.
Post Views:
389





