सोमैया महाविद्यालयात ॲनिमेशन आणि मीडिया प्रशिक्षण-कार्यशाळा
Animation and Media Training-Workshop at K.J.Somaiah College
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed28 Dec22 , 18.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त रेलीश इन्फोसॉफ्ट संस्था व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२७) रोजी ॲनिमेशन आणि मीडिया या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण-कार्यशाळा संपन्न झाली
रेलीश इन्फोसॉफ्ट, कोल्हापूर ही एक मान्यता प्राप्त संस्था असुन ॲनिमेशन आणि मीडिया या क्षेत्रातील अग्रगण्य इन्स्टिट्यूट म्हणुन ओळखली जाते. या संस्थेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त असुन या संस्थेच्या भारतभर विविध ठिकाणी शाखा आहेत. या संस्थेचा दोन वर्षापूर्वी महाविद्यालयाशी सामंजस्य करार झालेला असुन या संस्थेच्या वतीने ॲनिमेशनचे विविध कोर्सेस महाविद्यालयात सूरू करण्यात आलेले आहे.
ॲनिमेशन आणि मीडिया क्षेत्रात विद्यार्थ्यासाठी उत्तम करिअरची संधी ओळखुन महाविद्यालयाने या प्रशिक्षण-कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन विश्वस्त. संदिप रोहमारे, रेलीश इन्फोसॉफ्ट संस्थेचे बिजनेस हेड. श्रीधर मारणे, . कुंदन सोनवणे व प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

संदिप रोहमारे म्हणाले, महाविद्यालयात पारंपारिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण/कोर्स सुरू करने ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे करियरची संधी म्हणून बघावे असे सांगितले.
प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख प्रस्तुत करतांनाच रेलीश इन्फोसॉफ्ट संस्थेअंतर्गत चालणाऱ्या ॲनिमेशन आणि मीडिया सारख्या नव-नवीन कोर्सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होईल यासाठी विद्यार्थांनी आपल्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन व्यावसायिक शिक्षणाच्या जोडीने आपले करियर निवडले पाहिजे असे नमूद केले. जे शिक्षण केवळ पुणे, मुंबई व बँगलोर सारख्या महानगरीय ठिकाणी मिळत होते ते आता कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात मिळत असल्याने विद्यार्थांनी लवकरच आपला प्रवेश निश्चित करावा असे आव्हान ही त्यांनी केले.
श्रीधर मारणे म्हणाले कि आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे असुन आजच्या युवकांना टेक्नोलॉजीची आवड असल्याने त्यांची फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी सारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करण्यास पसंती असते. अशा वेळी ॲनिमेशन आणि मीडिया क्षेत्रात आपण उत्तम काम करुन रोजगार प्राप्त करू शकतो. आतापर्यंत ही संस्था ३०० पेक्षा जास्त मल्टिनॅशनल कंपन्यांशी संलग्न असुन ७००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे नमूद केले.

यावेळी कुंदन सोनवणे यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपप्राचार्य प्रा. बी.आर. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. नारायण बारे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, प्रा. सुजित पानगव्हाणे, प्रा. पंकज पाटील, प्रा. विशाल जगधने, प्रा. अभिजित वाघ व प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

सूत्रसंचालन डॉ. संजय दवंगे यांनी तर आभार प्रा. दिपक बुधवंत यांनी मानले
Post Views:
147