प्रोत्साहनपर अनुदान; विरोधकाकडून श्रेयासाठी शेतकऱ्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न – महेश परजणे
incentive grants; An attempt by the opposition to create confusion among farmers for credit – Mahesh Parjane
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed28 Dec22 , 18.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शेतकऱ्याची दिशाभूल करण्यासाठी अर्धवट माहितीच्या आधारावर चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करुन फुकटचे श्रेय घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माणकरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याची टीका संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कर्जदार शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान त्वरित मिळावे, यासाठी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याची फलश्रुती म्हणून कोपरगाव तालुक्यातील एकूण ७ हजार ४७७ शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केले आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्यात कोपरगाव तालुक्यातील १ हजार ३२३ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात २ हजार ९५ शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. तर या अनुदानापासून वंचित असलेल्या उर्वरित ४०५९ शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांच्याकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे महेश परजणे यांनी नमूद केले आहे. तेव्हा उगाच कोणी खोट्या नाट्या बातम्या देऊन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवू नये असा इशारा परजणे यांनी शेवटी पत्रकातून दिला आहे
Post Views:
351





