शिंगणापूर उपसरपंच कोल्हे गटाच्या रत्ना संवत्सरकर

शिंगणापूर उपसरपंच कोल्हे गटाच्या रत्ना संवत्सरकर

Ratna Samvatsarkar of Shingnapur Upasarpanch Kolhe Group

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu29 Dec22 , 18.20 Pm
By राजेंद्र सालकर 

कोपरगाव : तालुक्यातील शिंगणापुर उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या रत्ना शाम संवत्सरकर यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे तर सहायक म्हणून तलाठी संदिप लहाने, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर यांनी काम पाहिले.

सौ. रत्ना शाम संवत्सरकर यांच्या नावाची सुचना माजी उपसरपंच संजय तुळस्कर यांनी केली. त्यांच्या निवडीसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, माजी सरपंच यादवराव संवत्सरकर, राजेंद्र लोणारी, अंकुश कु-हे, भिमा संवत्सरकर, अविनाश संवत्सरकर यांनी सहकार्य केले. बिनविरोध निवडीबददल उपसरपंच सौ रत्ना संवत्सरकर यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्याप्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले. 
सरपंच डॉ. विजय काळे, व उपसरपंच सौ. रत्ना संवत्सरकर, माजी सरपंच सुनीता भिमा संवत्सरकर, माजी उपसरपंच संजय तुळस्कर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देतांना सरपंच. विजय काळे व उपसरपंच सौ. रत्ना संवत्सरकर म्हणाले की, गांव विकासासाठी एकोपा ठेवुन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू.
           
याप्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री. दिलीप चौखंडे, योगिता किशोर सानप, दिनकर भास्कर मोरे, बाळासाहेब बहिरूनाथ जाधव, चित्रा बद्रीनाथ घुमरे, वंदना योगेश महाले, अशोक मुरलीधर वराट, रेणुका जनार्दन राउत, सागर वसंतराव शिंदे, निलम विश्वास जानराव, पुजा प्रसाद आढाव, राणी अरविंद संवत्सरकर उपस्थित होते. शेवटी माजी सदस्य सुनिल शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page