रांजणगाव देशमुखच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे त्रिंबक रामभाऊ वर्पे  बिनविरोध 

रांजणगाव देशमुखच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे त्रिंबक रामभाऊ वर्पे  बिनविरोध  

Trimbak Rambhau Varpe of Kolhe group is unopposed as Deputy Sarpanch of Ranjangaon Deshmukh.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir30 Dec22 , 18.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  तालुक्यातील रांजणगाव देशमुख ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे त्रिंबक रामभाऊ वर्पे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत कोल्हे गटाचे ८ सदस्य निवडून आले आहेत.

उपसरपंच पदासाठी त्रिंबक रामभाऊ वर्पे यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
       नवनिर्वाचित उपसरपंच त्रिंबक वर्पे यांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे  साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
           कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील २७ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक झाली. त्यात तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचा आणि राहाता तालुक्यातील नाथ पाटलाची वाडी ग्रामपंचायतचा समावेश होता. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप अर्थात कोल्हे गटाने जोरदार मुसंडी मारत ग्रामपंचायत सदस्यांच्या सर्वाधिक जागा जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे. ९ ग्रामपंचायतींमध्ये कोल्हे गटाचे उमेदवार सरपंचपदी निवडून आले, तर २७ ग्रामपंचायतींमधील २५७ पैकी १२२ जागा जिंकून कोल्हे गटाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. उपसरपंच पदाच्या निवडणुकीतही कोल्हे गटाची सरशी सुरू आहे 

Leave a Reply

You cannot copy content of this page