दुस-या टप्प्यात भाजपा कोल्हे गटाचे चार ग्रामपंचायतीत उपसरपंच
In the second phase, BJP Kohle group sub-sarpanch in four gram panchayats
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir30 Dec22 , 18.10 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगांव : तालुक्यातील बहादराबाद, हंडेवाडी, देर्डे को-हाळे आणि चासनळी या चार ग्रामपंचातीत भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाचे उपसरपंच निवडले गेले आहेत.
शुकवारी दुस-या टप्यातील उपसरपंचपदाच्या निवडणुका विविध शासकीय अधिका-यांच्या उपस्थितीत घेण्यांत आल्या त्यात उपसरपंचपदी सौ. अनिता बाळासाहेब पाचोरे (बहादराबाद), रामनाथ निवृत्ती कोकाटे (हंडेवाडी), आशाताई. वसंतराव डुबे (देर्डे को-हाळे) तर विकास भाउसाहेब चांदगुडे (चासनळी) यांच्या निवडी पार पडल्या. या नवनिर्वाचित उपसरपंचांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
२६ ग्रामपंचायतीत कोल्हे गटाचे सर्वाधिक १२२ सदस्य मोठ्या मताधिक्क्याने निवडुन आले आहेत. करंजी, देर्डे को-हाळे आणि बहादराबाद या ग्रामपंचायतीत थेट जनतेतुन भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाचे सरपंच निवडुन आले आहेत.
नवनिर्वाचित उपसरपंच अनिता पाचोरे, रामनाथ कोकाटे, आशाताई डुबे आणि विकास चांदगुडे यांनी सत्कारास उत्तर देतांना सांगितले की, केंद्र व राज्य शासनअंतर्गत असणा-या सर्व योजनांची अंमलबजावणी युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करून विकासासाठी एकोपा दाखवू.
शेवटी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरूण येवले यांनी आभार मानले.
Post Views:
159