करंजी ग्रामपंचायत महाविकास आघाडीतून सेनेचे शिवाजी जाधव उपसरपंच
Sena’s Shivaji Jadhav Upasarpanch from Karanji Gram Panchayat Mahavikas Aghadi
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir30 Dec22 , 18.30 PmBy राजेंद्र सालकर
कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत कोल्हे गटाचे उमेदवार सोमनाथ बहिरु फपाळे यांचा दोन मताने पराभव करत महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शिवाजी कारभारी जाधव हे विजयी झाले.सरपंच रवींद्र आगवन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
निवडणूक प्रक्रियेचे कामकाज सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री शिंदे यांनी पाहिले. तर त्यांना ग्रामसेवक बाबासाहेब गुंड यांनी मदत केली.
आ.आशुतोष काळे व शिवसेनेचे नितीन औताडे यांना मानणारा मोठा वर्ग करंजी मध्ये असल्याने ही महाविकास आघाडी गावात स्थापन करण्यात आली.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काळे गटाचे पाच तर शिवसेना पक्षाचे दोन सदस्य निवडून आले आहेत.
शिवसेनेचे नितिन औताडे, जिल्हा परिषद सदस्य कारभारी आगवन , काळे कारखान्याची माजी संचालक संजय आगवन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.
उपसरपंच शिवाजी जाधव हे विजयी झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
उपसरपंच शिवाजी जाधव हे विजयी झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कारभारी आगवण, संजय आगवण,ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगवण, नानासाहेब डोखे, शंकर आहेर, रूपाली जाधव ,सुमन चरमळ, पूजा डोखे, विकास शिंदे ,लक्ष्मण भिंगारे, सतीश भालेराव ,संजय उगले ,चंद्रकांत भिंगारे, भाऊसाहेब शेळके, संजय शिंदे, कृष्णा आहेर ,बंडू आगवन, सुनील जाधव, भरत जगताप, संजय आगवन, गोपाळा कुलकर्णी ,नामदेव भिंगारे, अल्ताफ शेख ,केशव चरमळ ,अर्जुन चेरमळ, मुकुंद आगवन अदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना शिवाजी जाधव म्हणाले नितीन औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेत गावातील विकास कामांमध्ये बारकाईने लक्ष घालून विविध योजना राबवल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले. शेवटी आभार संजय आगवन यांनी मानले.
Post Views:
360