समृध्दी महामार्गाच्या कामामुळे खराब  झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम मार्गी लागले 

समृध्दी महामार्गाच्या कामामुळे खराब  झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम मार्गी लागले 

The work of Samruddhi Highway started the repair work of damaged roads

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir30 Dec22 , 18.50 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामामुळे तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांच्या कामाबाबत भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अधिकाऱ्यांबरोबर बैठक सूचना केल्या होत्या त्यामुळे हे  काम मार्गी लागले आहे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील समृद्धी  महामार्गांपैकी २९ किलोमीटरचा महामार्ग कोपरगाव   मतदार संघातील ११ गावातून गेला आहे. त्यामुळे समृध्दी महामार्गाच्या परिसरातील ग्रामीण मार्ग, शिवरस्ते, वाड्या वस्त्यावरील रस्ते, तसेच दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची  दयनीय अवस्था झाल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल देण्यास अडचण निर्माण झाली होती त्यांचे आर्थिक नुकसान होत होते या गोष्टी सौ कोल्हे यांनी पालकमंत्री व अधिक्षक अभियंता विश्वनाथ सातपुते, कार्यकारी  अभियंता यशवंत पाटील, उपअभियंता सुरेद्र बावा या संबंधित अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या   
           सदर रस्त्यांची कामे सुरू होणार असून यामध्ये तालुक्यातील धोत्रे ते खोपडी, वारी, कान्हेगाव, भोजडे ते वारी, भोजडेचौकी ते कान्हेगाव, संवत्सर ते कान्हेगाव वारी, कान्हेगाव ते गोदावरी, कोकमठाण ते सडे, कारवाडी, कोपरगाव ते शिंगवे, जेउर कुंभारी ते सावळीविहीर फार्म, पुणतांबा फाटा ते झगडे फाटा, सावळीविहीर फार्म, एनएच १६०बी ते सावळीविहीर रस्ता, देर्डे ते पोहेगाव रस्ता, दरडे  को-हाळे एनएच १६० ते पोहेगाव एसएच ६५ आदी रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच अंडरपास दरम्यान असणा-या बोगद्यामध्ये पाणी साचत असल्याने त्यावरही उपाययोजना करण्याचे काम हाती घेतल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page