डाऊच खुर्द उपसरपंंच उध्दव ठाकरे सेनेच्या रईसबानो सय्यद बिनविरोध
Dauch Khurd Deputy Sarpanch Uddhav Thackeray Sena’s Raisbano Syed Unopposed
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir30 Dec22 , 19.00 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या रईसबानू भैय्यासाहेब सय्यद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे डाऊच खुर्द ग्रामपंचायत वर सरपंच उपसरपंच उद्धव ठाकरे सेनेचे झाले आहेत.
शिवसेनेचे नितीन औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच संजय गुरसळ यांनी डाऊझ खुर्द ग्रामपंचायतच्या निवडणुकीत चौरंगी लढतीत शिवसेनेचा किल्ला लढवितांना मागील पंचवार्षिक ला केलेल्या विकास कामाच्या जोरावर प्रस्थापित काळे, कोल्हे व परजणे गटाला मात देत पुन्हा एकदा सत्ता शिवसेनेकडे खेचून आणली. आज मुस्लिम समाजाच्या सदस्याला उपसरपंच पद देऊन जाती भेदाची दुरी कमी केली.
लोकनियुक्त विद्यमान सरपंच नेहा संजय गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी बाळासाहेब साबळे यांनी पाहिले तर त्यांना ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांनी मदत केली.
यावेळी माजी सरपंच संजय गुरसळ म्हणाले, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांना बरोबर घेत मागील पंचवार्षिक प्रमाणे विकासाची घोडदौड सुरू ठेवत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना गावात राबवल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले
यावेळी माजी सरपंच संजय गुरसळ, भागवतराव गुरसळ ,चंद्रकांत गुरसळ, बाळासाहेब गुरसळ,दादाभाई सय्यद, सुनील गुरसळ ,मच्छिंद्र गुरसळ, मोहन गुरसळ, मुन्नाभाई सय्यद, जावेद पठाण, मोहम्मद सय्यद, मुस्ताक सय्यद, देवा पवार, शाहरुख शेख, बाबासाहेब गुरसळ, वेनुनाथ पवार, सर्जेराव गुरसळ, माणिक चव्हाण जाईद सय्यद, फय्याद सय्यद ,अर्जुन होन ,असलम सय्यद, गौरव गुरसळ, सौरव गुरसळ ग्रामपंचायत सदस्य दिगंबर पवार ,धनश्री गुरसळ, अश्विनी पवार ,चंद्रकांत पवार, सुनील माळी, मच्छिंद्र जाधव अदी उपस्थित होते.
. शेवटी आभार ग्रामपंचायत सदस्य दिगंबर पवार यांनी मानले.
Post Views:
284