खादी ग्रामोद्योग संघाच्या निवडणुकीत कोल्हे गट विजयी, काळे गटाचा दारुण पराभव 

खादी ग्रामोद्योग संघाच्या निवडणुकीत कोल्हे गट विजयी, काळे गटाचा दारुण पराभव

In the election of the Khadi Gramodyog Sangh, the kohle group won, the Kale group suffered a heavy defeat

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon 2 Jan23 , 18.10 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  कोपरगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ मर्यादित संस्थेची निवडणूक पार पडली.या निवडणुकीत कोल्हे गट व काळे गट समोरा समोर रिंगणात असतांना काळे गटाचा धुवा उडवुन कोल्हे गटाने विजयाचा गुलाल उधळत नववर्षाची विजयी सुरवात केली आहे.

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली प्रगती विकास मंडळाचे सर्वच्या सर्व ११ सदस्य बहुमताने विजयी झाले आहे.
तब्बल ४० वर्षांनी झालेली ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती त्यात कोल्हे गटाने बाजी मारत सरस असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-

सर्वसाधारण जागा-गुरसळ संजय किसन (३४९), चव्हाण दादासाहेब सखाहरी(३४३), चव्हाण भिकाजी गोकुळ(३३२),पगारे दत्तात्रय विठ्ठलराव (३४१),वक्ते कर्णासाहेब रामचंद्र (३४६),वक्ते कोंडीराम संपत(३४३).
महिला राखीव-पगारे शैला उमेश(३४७),शिंपी रजनी फकिरा(३३१).अनु.जाती जमाती-गायकवाड दिपक सिताराम(३४२)इतर मागास प्रवर्ग-पगारे सुरेश अंबादास(३६५) भविजा/जमाती/विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी – फटांगरे नामदेव कारभारी (३६१) प्रगती विकास मंडळ पॅनलचे अध्यक्ष मधुकर वक्ते, शिवाजीराव वक्ते,भीमराव वक्ते, बाळासाहेब वक्ते,शरदनाना थोरात,सतिषराव आव्हाड, विठ्ठलराव आव्हाड,आनंदा चव्हाण, तुळशीदास पगारे,दिपकराव गायकवाड, आनंदराव चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, बाजीराव वक्ते,फकिरराव शिंपी,भीमा संवत्सरकर,संजय होन,मिलन चव्हाण, जालिंदर चव्हाण आदिंसह पदाधिकारी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page