अधिकाऱ्यांकडून प्रलंबित प्रश्नावर ठोस कारवाई होत नसेल; तर वेगळ्या मार्गाने प्रश्न हाताळावे लागेल – विवेक कोल्हे
There is no concrete action on the pending issue by the authorities; So the question has to be handled in a different way – Vivek Kolhe
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : गेल्या आठ महिन्यापासून जनता दरबाराच्या माध्यमातून मतदार संघातील प्रलंबित प्रश्न पोट तिडकीने मांडत आलो आहोत. मात्र अधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सोडवणूक होताना दिसत नाही प्रत्येक बैठकीत संबंधित अधिकाऱ्याकडून चौकशी करून सांगतो असे पठडीतले उत्तर ऐकावयास मिळून बोळवण होत असल्याचे दिसून येत आहे तेंव्हा आता समाज विकासाच्या प्रलंबित प्रश्नावर ठोस कारवाई होत नसेल; तर वेगळ्या मार्गाने प्रश्न हाताळावे लागेल अशा शब्द स्पष्ट शब्दात जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे सोमवारी झालेल्या जनता दरबारात अधिकाऱ्यांना सुनावले
डाउच बुद्रुक येथील सामाजिक सभागृहासमोर दांडगाईने अतिक्रमण करून दुग्ध व्यवसाय चालविला जात आहे त्याच्या लेखी तक्रारी करूनही न्याय मिळत नाही असे बाबा दहे म्हणाले. समृध्दी महामार्गाचे काम पुर्णत्वाकडे आले पण कोपरगांव तालुक्यातील ११ गावातुन यासाठी जमिन संपादित करण्यांत आली तेथील शेतक-यांचे पाटपाण्यांचे व चा-यांचे तसेच सायफनचे प्रश्न ठेकेदार मंडळी करत नाही त्यांच्यावर कुणी राजकीय दबाव टाकला आहे काय, मळेगांवथडी जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना कामासाठी मोजणीचा अर्ज देवुनही त्यावर कार्यवाही होत नाही असे सरपंच अनिता किरण उगले यांनी मांडला, शेतक-यांना तसेच विविध ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनांना पुर्ण दाबाने वीजेचा पुरवठा करावा, जी रोहित्र खराब आहे ते दुरूस्त होवुन मिळावी, काही वीज रोहित्रांचे अपग्रेडेशन करावयाचे ते तातडीने करून द्यावे, बिबटे हिंस्व प्राण्यांचा वावर वाढल्यांने शेतक-यांना रात्री अपरात्री पिकांना पाणी देता येत नाही तेंव्हा दिवसा वीज द्यावी अशा तक्रारी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे संचालक ज्ञानदेव औताडे, माजी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, जनार्दन कदम, यांच्यासह उक्कडगांव, मळेगांवचडी, चांदगव्हाण, धारणगांव, ब्राम्हणगांव, टाकळी, वारी, रांजणगांव , देशमुख, मनेगांव आदि गांवच्या शेतक-यांनी मांडल्या.
ब्राम्हणगांव देवी मंदिराजवळील शौचालय व स्वच्छतागृहाचे काम अपूर्ण आहे, सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये अतिवृष्टी होवुन शेतक-यांचे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले त्यायी विमा कंपन्यांनी तुटपूंजी भरपाई दिली, कासली, हिंगणी, वेळापूर स्मशानभूमीचे काम अपूर्ण आहे, शिंगणापुर आदिवासीसाठी दीड वर्षापासून वीज जोड मिळत नाही, आपत्ती व्यवस्थापन निधीतुन सोनारी संरक्षक भिंतीचे काम करावे, रवंदे ते मळेगांवथडी. झगडेफाटा ते रांजणगांव देशमुख, चांदेकसारे ते कुंभारी यासह विविध गावातील रस्त्यांचे कामे तात्काळ मार्गी लावावी, घरकुल ड यादी फेर सर्व्हेक्षणात वंचितांना तात्काळ न्याय द्यावा, मनेगांव घरकुल लाभार्थ्याबाबत बोगस अहवाल देण्यांत आला असुन त्यात लक्ष घालून वंचितांना न्याय द्यावा आदि मागण्या करण्यात आल्या.