साहेब’आबाच्या चहाच्या टपरीवर पाकिटे घेतात; मनसेच्या विधानावर  कोपरगाव पालिका कर्मचाऱ्यांचे ४ तास काम बंद

साहेब’आबाच्या चहाच्या टपरीवर पाकिटे घेतात; मनसेच्या विधानावर  कोपरगाव पालिका कर्मचाऱ्यांचे ४ तास काम बंद

Saheb takes packets on Aba’s tea tap; On the statement of MNS, Kopargaon Municipality employees stopped work for 4 hours

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu5 Jan23 , 16.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :नगरपरिषदेचे प्रभारी नगर अभियंता  सुनिल ताजवे हे आबाच्या चहाच्या  टपरीवर बसून ठेकेदाराचे पाकीटे घेतात  या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या जाहीर विधानावर कोपरगाव नगरपालिकेच्या कामगारांनी गुरुवारी सकाळी १० ते २ ४ तास काम बंद केले; मुख्याधिकारी यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले अशी माहिती कामगार संघटने कडून प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे.

कोपरगांव शहरामधील भाजपा पदाधिकारी व माजी नगरसेवक हे मंगळवारी (दि.३) रोजी
नगरपरिषदेच्या नागरिकांच्या विविध प्रश्नाचे निवेदन घेवून चर्चेसाठी आले असता त्यामध्ये विशेषतः आरोग्य, पाणी पुरवठा व शहरातील विकास कामाबाबत चर्चा झाली होती.
यावेळी आलेल्या आंदोलकांच्या निदर्शनास नगरपरिषदेमध्ये पुर्णवेळ बांधकाम अभियंता कार्यरत नाही.अपुरे मनुष्यबळ, नगरपरिषदेच्या आर्थिक अडचणी याबाबत वस्तुस्थितीत निवेदन स्विकारतांना लक्षात आणून दिले होते. असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे 
तरीही स्थानिक गटतटाच्या राजकारणामुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचेवर कोणताही आधार नसताना मनसेच्या पदाधिकारी यांनी  नगरपरिषदेचे प्रभारी नगर अभियंता  सुनिल ताजवे हे आबाच्या चहाच्या टपरीवर बसून ठेकेदाराचे पाकीटे घेतात असा मानहानीकारक व बदनामी होईल असे जाहीररित्या आंदोलनामध्ये विधान केले होते. याचा गुरुवारी नगरपरिषदेतील अखिल भारतीय सफाई कामगार संघटना, नगरपरिषद कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य संवर्ग कर्मचारी संघटना यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन वैयक्तीक राजकीय स्वार्थपोटी, राजकीय हेतूने नाहक बदनामी करण्याचे मानसिकेतेचा
जाहीर निषेध करणेत आला. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या ठेकेदारांनी जाणीव पुर्वक बदनामी करणेसाठी व राजकीय पोळी भाजणेसाठी बेच्छुट आरोप करित असल्याचे मत प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले.
 कामगारांनी आपले निषेधाचे  निवेदन शांताराम गोसावी, मुख्याधिकारी कोपरगांव नगरपरिषद व मा. तहसिलदार, तहसिल कार्यालय, कोपरगांव यांना दिले.
कोपरगांव शहरातील नागरीकांची गैरसोय होवू नये म्हणून  मुख्याधिकारी यांनी सदर आदोलन मागे घेणेबाबत विनंती केली त्यास प्रतिसाद म्हणून कर्मचा-यानी सकाळी १० वाजता सुरू केलेले आंदोलन दुपारी २ वाजता  मागे घेतले आहे. सदर आदोलन शांतेत पार पडले. असा दावा कामगारांच्या वतीने करण्यात आला

चौकट

कोपरगांव नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी कोपरगांव मधील नागरीकांसाठी चागली सेवा देण्याचा अखंड प्रयत्न करतात, करदात्याच्या कराचा गैरवापर होणार नाही व उधाळपट्टी होणार नाही यांची दक्षता घेणेस कटिबदध आहे. असा मनोदय व्यक्त केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page