विवेक कोल्हे यांचा जनता दरबार; थेट निवाडा, नागरीकांना हक्काचे व्यासपीठ
Janata Durbar by Vivek Kolhe; Direct adjudication, platform of rights for citizens
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu5 Jan23 , 16.10 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : येथे जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी जनता दरबार सुरू केल्याने शहरातील तालुक्यातील नागरिकांना त्यांचे प्रश्न व समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. दरम्यान, विवेक कोल्हे यांनी सुरू केलेल्या जनता दरबाराची दखल प्रशासकीय स्तरावर घेण्यात येत आहे.
तालुक्यातील १७ समाज मंदिर सभागृहाचे खोळंबलेले काम, दुबार व नवीन रेशन कार्ड न मिळणे, रेशन धान्याचा होणारा काळाबाजार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बंदिस्त नाट्यगृहाचे काम एक दीड वर्ष झाले सुरू का होत नाही ? शहरात अस्वच्छ पिण्यांच्या पाण्याचा पुरवठा होत आहे त्यातुन रोगराई वाढते आहे, जी रस्त्यांची कामे सुरू आहेत त्याचा दर्जा बेसुमार आहे., डाउच बुद्रुक येथील सामाजिक सभागृहासमोर दांडगाईने अतिक्रमण करून दुग्ध व्यवसाय चालविला जात आहे त्याच्या लेखी तक्रारी करूनही न्याय मिळत नाही
राजकीय कोणाच्या राजकीय दबावपोटी समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिलेल्या अकरा गावातील शेतकऱ्यांचे पाठ पाण्याचे चाऱ्याचे व साहेबांचे प्रश्न ठेकेदार करीत नाहीत,मळेगांवथडी जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना कामासाठी मोजणीचा अर्ज देवुनही त्यावर कार्यवाही होत नाही , शेतक-यांना तसेच विविध ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनांना पुर्ण दाबाने वीजेचा पुरवठा करावा, जी रोहित्र खराब आहे ते दुरूस्त होवुन मिळावी, काही वीज रोहित्रांचे अपग्रेडेशन करावयाचे ते तातडीने करून द्यावे, बिबटे हिंस्व प्राण्यांचा वावर वाढल्यांने शेतक-यांना दिवसा वीज द्यावी, शौचालय व स्वच्छतागृहाचे काम अपूर्ण आहे, अतिवृष्टी पोटी विमा कंपन्यांनी तुटपूंजी भरपाई दिली, स्मशानभूमीचे काम अपूर्ण आहे, आदिवासीसाठी दीड वर्षापासून वीज जोड मिळत नाही, आपत्ती व्यवस्थापन निधीतुन संरक्षक भिंतीचे काम करावे, विविध गावातील रस्त्यांचे कामे तात्काळ मार्गी लावावी, घरकुल ड यादी फेर सर्व्हेक्षणात वंचितांना तात्काळ न्याय द्यावा, घरकुल लाभार्थ्याबाबत बोगस अहवाल देण्यांत आला असुन त्यात लक्ष घालून वंचितांना न्याय द्यावा या संदर्भात जनता दरबाराच्या माध्यमातून तहसील कचेरी व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या दालनात विवेक कोल्हे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी समस्या मांडल्या. रोखठोक समस्या व प्रश्नांचा समोरासमोर निवाडा होत असल्याने थेट अधिकाऱ्याच्या दालनात होणाऱ्या जनता दरबाराचे नागरिकांनी स्वागत केले. दरम्यान, अशा प्रकारचा जनता दरबार सुरू झाल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आता कोल्हे यांनी पंचायत समिती, कृषी बाजार समिती, वीज वितरण कार्यालय, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, एसटी बस आगार, पाटबंधारे विभाग या ठिकाणी आपला थेट जनता दरबार घ्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे