शंभू’ घोडा गेला..अंत्यविधीला जमलं अख्खं गाव;  शोकाकुल वातावरणात घोड्यावर अंत्यसंस्कार 

शंभू’ घोडा गेला..अंत्यविधीला जमलं अख्खं गाव;  शोकाकुल वातावरणात घोड्यावर अंत्यसंस्कार 

Shambhu’s horse is gone..The whole village gathered for the funeral; Cremation on horseback in a mournful atmosphere

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu5 Jan23 , 16.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : पशु-पक्षी असो वा मनुष्यप्राणी असो, जीव लावला की आपलेसे कधी होता कळतच नाही. असाच एक प्रकार कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी  गावात घडला. शंभू नामक ३६ महिन्याच्या  घोड्याचे मंगळवारी (३) रोजी गॅस्ट्रो आजाराने निधन झाले.

शंभूचा मृत्यूने संपूर्ण गुडघे कुटुंबियांवर शोककळाच पसरली. कुटुंबातील सदस्यच गेल्याचे दु:ख बाळगत त्यांनी घोडय़ाचा  अंत्यविधी विधी केला. यावेळी  हजारो ग्रामस्थ व वैजापूर, संगमनेर, नाशिक, मालेगाव, नगर , कोपरगाव येथील अश्वप्रेमी शंभूच्या अखेरच्या दर्शनासाठी आले.

शंभूने सोडले प्राण

सोनेवाडी या गावातील सुनील गोविंद गुडघे कुटुंबातील शंभू हा घोडा सर्वांचा विशेष लाडका. अवघ्या तीन महिन्यांचे एक शिंगरू गुडघे कुटुंबीयांनी जवळ केले. त्याच्यावर संपूर्ण कुटुंबीयाचा जीव जडला. सगळे त्याच्या प्रेमातच पडले होते. दररोज पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याला घरचा सदस्य म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात सहभागी करून घेत असत. शंभू असा आवाज दिला की शंभू कुठेही असला तरी दौडतच घरासमोर यायचा. विशेष म्हणजे गुडघे कुटुंबीयांची ओळखच या ‘शंभू’मुळे परिसरात झाली. 

नगर नाशिक औरंगाबाद आधी जिल्ह्यात शर्यतीच्या  मैदानावर एकदाही हार या शंभू घोड्याने पत्करली नव्हती. अनेक शर्यती जिंकत त्याने आपले चाहता वर्ग कामवला होता. शर्यतीतील  सततच्या विजयामुळे  आपल्या ३६ महिन्याच्या आयुष्यात शंभुने अनेक पराक्रम करत वेगवेगळ्या ठिकाणी शर्यती जिंकल्या होत्या. पुणे येथील शर्यत जिंकल्यानंतर शंभूला ११ लाख रुपयांची मागणी झाली होती. मात्र सुनील गुडघे यांनी शंभू आपल्या घरातील एक सदस्य असल्याने शंभूची विक्री होणार नाही असे सांगितले. 
दोन दिवसांपूर्वीच शर्यतीचे मैदान गाजवून आल्यानंतर पुन्हा गुरुवारी शर्यतीला जाण्यासाठी शंभू व टीमची तयारी सुरू झाली होती. मात्र मंगळवारी रात्रीच शंभूला अस्वस्थ वाटू लागल्याने सुनील गुडघे ,सौ अनिता गुडघे मुलगा राहुल गुडघे व  चिंतातूर झाला. शंभू आजारी असल्याने त्यांनी रात्रीचे जेवणही घेतले नाही ताबडतोब पशुवैद्यकीय डॉ चव्हाण व डॉ घायतोडे यांना शंभुवर उपचार करण्यासाठी बोलावले. डॉक्टरासह गुडघे परिवार रात्रभर शंभूला बरं वाटावे म्हणून प्रार्थना करत होता. मात्र  शंभू गॅस्ट्रोने  आजारी पडला. त्यावर औषधोपचार करण्यात आले. परंतु, काहीही उपयोग झाला नाही. एरवी कुटुंबीयांशी मस्ती करणारा शंभू  केवळ पाणावलेल्या डोळ्यांनी कुटुंबीयांकडे पाहत असे. या आजारातच त्याने  प्राण सोडला. 
रातोरात शंभूच्या निधनाची बातमी पसरतात सोनेवाडी ग्रामस्थांसह परिसरातील अश्वप्रेमी शोकसागरात बुडाल्याची दिसून आले. शंभूचा अवेळी जाण्याने संपूर्ण गुडघे कुटुंबीयांना हादराच बसला. त्या दिवशी कुटुंबातील कोणीही जेवले नाही. अगदी घरातील एका सदस्याचा मृत्यू झाल्यासारखा सर्वानी हंबरडा फोडला.
बुधवारी( ४) रोजी सकाळी दहा वाजता शंभूच्या अंत्य दर्शनानंतर सुनील गुडघे यांच्या शेतातच शंभुला समाधिस्त करण्यात आले. पाळीव प्राण्यांप्रती असलेले एवढे प्रेम स्थानिकांनी प्रथमच अनुभवले.

Leave a Reply

You cannot copy content of this page