संजीवनी शैक्षणिक संकुलात विद्यापीठ होण्याची क्षमता- प्रसन्ना जोशी
Potential to become a university in Sanjeevani Educational Complex- Prasanna Joshi
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat7 Jan23 , 19.00 Pm
कोपरगाव : कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वांत मोठे योगदान हे संजीवनी ग्रामीण इन्स्टिट्यूटचे आहे. आज संपूर्ण देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांची यादी पाहिली, तर ही सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये संजीवनी या नावाचा समावेश आहे.प्लेसमेंट सुसज्ज व दर्जेदार सुविधा, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार,नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत विद्यार्थी कार्यरत यामुळे संजीवनी शैक्षणिक संकुलात विद्यापीठ होण्याची क्षमता असल्याचे गौरवउद्गार साम टीव्ही चे कार्यकारी संपादक प्रसन्ना जोशी यांनी संजीवनी अभियांत्रिकी येथे शुक्रवारी पत्रकार दिनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे या होत्या.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संजीवनी शैक्षणिक संकुलाचे मॅनेजिंग ट्रस्ट अमित कोल्हे यांनी केले
व्यासपीठावर माजी आमदार स्नेहलता कोल्हे संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे मॅनेजिंग ट्रस्ट अमित कोल्हे विश्वस्त सुमित कोल्हे मान्यवर उपस्थित होते.
प्रसन्ना जोशी पुढे म्हणाले,बातमी ज्याला कळते तो खरा पत्रकार आतील आग त्याला स्वस्थ बसु देत नाही वृत्तवाहिन्यांमध्ये तोंडवळा तयार झाला आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. सोशल मीडिया हे देखील एक बीट झाले आहे.जग अतिशय वेगवान झाले आहे. सोशल मीडियामुळे माहितीचा स्फोट होऊन तुफानी वेगाने ती सार्वत्रिक होत आहे. अशा काळात वेगळेपण सिद्ध करण्यासाठी ग्रामीण पत्रकारांनी स्वतःला तपासले पाहिजे. अपडेट राहिले पाहिजे. अभ्यासू वृत्ती वाचनातून वाढविता येईल. नव्या गरजेपोटी पत्रकारितेतही बदल झाले आहेत.ते आव्हानात्मक इंटेरेस्टींग आहे.ग्रामीण पत्रकारितेत काम करण्याच्या मोठ्या संधी आहेत. ग्रामीण पत्रकार मैदानावर काम करणारा सोल्जर आहे. ग्रामीण जनतेच्या आवाजाला मात्र अतिशय क्षीण प्रसिद्धी मिळते.तुमच्या कच्च्या मालावर आम्ही पक्का माल करतो तुमच्या स्टोरीवर आम्हाला शहरात पुरस्कार मिळतात. साहित्य आणि पत्रकारीतेत टोकाचे राजकारण असते माध्यमांनी मांडलेले सामाजिक प्रश्न सोडविण्याची भूमिका शासन नेहमीच बजावते. प्रसारमाध्यमे ही खऱ्या अर्थाने समाजमनाचा आरसा दाखविण्याचे काम करतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात काम करणा-या पत्रकारांपुढे आस्तित्वाचा आणि स्वत्व टिकविण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. शहरी पत्रकारितेच्या तुलनेत ग्रामीण पत्रकारिता भयंकर कठीण आहे. अनेक स्थानिक हितसंबंध सांभाळून पत्रकारिता करावी लागते. कारण प्रश्न असतो कुटुंबाच्या आणि स्वतःच्या सुरक्षेचा. यामुळेच ही पत्रकारिता विशिष्ट चौकटीत अडकली आहे. असेही ते शेवटी म्हणाले,
यावेळी बोलताना स्नेहलता कोल्हे म्हणाले पत्रकारितेतून थेट समाजाला दिशा देता येणं, समाजातील विविध विषयांचा मागोवा घेत त्यातून जनतेचे प्रश्न मांडता येणं, नुसतं प्रश्न मांडून उपयोग नाही, तर त्याची उत्तरं सुद्धा शोधता आली पाहिजेत , आजकाल राजकारणात नियम पाळले जात नाहीत आरोप प्रत्यारोपामुळे दर्जा ढासळला आहे. कुठल्या बातमीला किती महत्व आणि स्थान द्यायचे याचे तारतम्य बाळगणे जरूरीचे आहे असे वाटते. तसेच आपल्या हाती पत्रकारितेचे शस्त्र आहे ते जबाबदारीने वापरणे जरूरीचे आहे. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हे धोरण पत्रकारांनी अवलंबण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या
सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक साहेबराव दवंगे यांनी केले