गोदाकाठ महोत्सव;  बचत गट महिलांच्या अर्थकारणाला चालना – सौ.पुष्पाताई काळे

गोदाकाठ महोत्सव;  बचत गट महिलांच्या अर्थकारणाला चालना – सौ.पुष्पाताई काळे

Godakath Festival; Self-help groups promoting the economy of women – Mrs. Pushpatai Kale

दिंडीच्या रिंगणात आमदार आशुतोष काळे व चैताली काळे यांची फुगडी Fugdi of MLA Ashutosh Kale and Chaitali Kale in the arena of Dindi

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat7 Jan23 , 19.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव–  ऐतिहाहिक,पौराणिक वारसा असलेल्या कोपरगावच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन  घडविणारा  गोदाकाठ महोत्सव बचत गटाच्या महिलांच्या अर्थकारणाला चालना देणारा असल्याचे प्रतिपादन  प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा.सौ. पुष्पाताई काळे यांनी शुक्रवारी’गोदाकाठ महोत्सव २०२३’ चे शुभारंभी केले

यावेळी आ. आशुतोष काळे व  जिल्हा  बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले 

सौ पुष्पाताई  काळे  पुढे म्हणाल्या की,  गोदामाईच्या कविता असलेल्या कोपरगावच्या पावन भूमीत बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळून त्यांचा आर्थिक उत्कर्ष व्हावा या उद्देशातून  गोदाकाठ महोत्सव सुरू करण्यात आला आहे. मागील दोन वर्ष वैश्विक  कोरोनाच्या दोन वर्षानंतरपुन्हा एकदा हा गोदाकाठ महोत्सव सुरु झाल्यामुळे बचत  गटांना उभारी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाचा गोदाकाठ महोत्सव  सामाजिक बांधिलकीतून हजारो महिला बचत गटांना आर्थिक सक्षम करणारा आधारस्तंभ झाला आहे  

सौ. चैताली काळे म्हणाल्या की, बचत गटाच्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे व्रत हाती घेतलेल्या या गोदाकाठ महोत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असुन दोन वर्षात भरारी घेत  २०० च्या आत असलेले बचत गटाच्या  स्टॉल्सची संख्या ३०० पर्यंत जावून  पोहोचल्याने आर्थिक प्रगती झाल्याचे अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून कोपरगाव शहरात बालवारकऱ्यांची दिंडी,रायरेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी  स्वराज्य स्थापनेची केलेली प्रतिज्ञा,झांज पथक, वासुदेव गीत, तीन पावरी नृत्य, बांबूवरील नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम दाखवून उपस्थिता हजारो नागरिकांना मंत्रमुग्ध केले. सजवलेल्या बैलगाडीतून  सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिला मंडळाची काढण्यात आलेली भव्य, दिव्य मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.  

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, संलग्न संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला मंडळांच्या सदस्या, शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आदी उपस्थित होते.

चौकट :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे बालवारकऱ्यांची दिंडी आली असता त्या ठिकाणी भजनानंदी रंगलेल्या उभ्या गोल रिंगणात आ.आशुतोष काळे व सौ.चैताली काळे यांनी देखील बालवारकरी समवेत हरिनामात दंग होवून वारकरी फुगडी खेळण्याचा आनंद लुटून ब्रम्हानंदाची अनुभूती घेतली.

        

Leave a Reply

You cannot copy content of this page