महाराष्ट्रातील पत्रकारितेचा वारसा जिवंत ठेवण्याचे काम गावातील पत्रकार करतात – संजय आवटे

महाराष्ट्रातील पत्रकारितेचा वारसा जिवंत ठेवण्याचे काम गावातील पत्रकार करतात – संजय आवटे

Village journalists work to keep Maharashtra’s journalistic legacy alive – Sanjay Awte

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun8 Jan23 , 19.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : महाराष्ट्रात पत्रकारितेचा वारसा खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचे काम  शहरातील नव्हे तर गावातील पत्रकार करीत असून त्या दिशेने आणि त्या वाटेने तो चालत असल्याने मी निश्चिंत असल्याचे गौरवउद्गार   वरिष्ठ संपादक संजय आवटे यांनी रविवारी कर्मवीर शंकरराव काळे  उद्योग समूहाच्या वतीने कोळपेवाडी येथील पत्रकार सन्मान सोहळ्यात केले. अध्यक्षस्थानी काळे कारखान्याचे चेअरमन  आमदार आशुतोष काळे होते.

पत्रकार दिनाच्या पत्रकारांना शुभेच्छा देताना आमदार आशुतोष काळे
 प्रमुख पाहुण्यांचा प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार  आ. आशुतोष काळे यांनी केला यावेळी प्रास्ताविक करताना ते म्हणाले  मी आमदार झालो आणि कोरोनाचे संकट आले  त्यात दोन वर्ष गेले  परंतु आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मतदार संघातील बरेच प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला तीन वर्षात केलेल्या कामाला आपण सर्वांनी आपापल्या परीने योग्य ती प्रसिद्धी दिल्याने मला काम करण्याची ऊर्जा मिळाली काम करताना सर्व शंभर टक्के बरोबर असेल असे नाही  थोड्या फार चुका होतही असतील चुका होतही असतील  त्याच्यावर आवाज  उठविण्याचे काम आपण जनतेच्या माध्यमातून करत असतात म्हणून आपण जरी थोडेफार इकडे तिकडे लिहिलं तर मी काही फार काही मानत नाही काही चुकलं असेल तर सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो एखादी बातमी निगेटिव्ह असेल तर ती पॉझिटिव्ह करण्याचे कामही तुम्ही करतात यापुढेही सहकार्य प्रेम चालू ठेवावा लोकशाही मधला चौथा खांब आपल्याकडे पाहिले जाते जनतेचा आवाज योग्य पद्धतीने प्रशासनाकडे पोहोचण्याचे काम आपण करतात यापुढेही असेच काम आपण करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
पत्रकारांना मार्गदर्शन करताना पुण्यनगरीची उपसंपादक विकास अंत्रे
पुण्यनगरीचे उपसंपादक विकास अंत्रे यावेळी म्हणाले, कोपरगाव चे राजकारण काळे कोल्हे यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. स्वर्गीय शंकरराव काळे  यांनी समाजकारणातून राजकारण केले. आशुतोष काळे राजकारणात जेंटलमन पद्धतीने काम करतात हे आमदार झाल्यापासून माझ्या विरोधात बातमी का छापली ? असा फोन न करणारे नगर जिल्ह्यातील एकमेव आमदार  ही त्यांची एका वाक्यातील ओळख आहे. इतकं माध्यमांना स्वातंत्र्य आणि इतकं आपल्या लोकांना समजून घेण्याचं काम करण्याची वृत्ती त्यांच्या ठायी आहे. माध्यमातील जे काही प्रवाह आहे, भूमिका आहेत हे सर्व  दिलखुलास पद्धतीने स्वीकारले तरच लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत राहू शकते.
संजय आवटे पुढे म्हणाले गोयंका पुरस्कारातील ८० टक्के पुरस्कार हे ग्रामीण भागातील बातम्यांसाठी दिले गेलेले आहेत त्यानंतर असे लक्षात आले की त्यापैकी ९०टक्के बातम्या शहरातील लोकांनी ग्रामीण भागात येऊन कव्हर केलेले आहेत खरे म्हणजे ग्रामीण भागातील पत्रकारांनी ही बातमी पूर्वी पाठवलेली असते परंतु तेव्हा मात्र त्या बातमीचे महत्त्व कळत नसते मला असे वाटते की तुमची बातमी दारी तुमच्या बातम्या तुमचे विषय हे अधिक महत्त्वाचे असतं उलट पक्षी ते विषय तुम्ही ठामपणे ठोसपणे मांडत राहिल्यामुळेच  आजही सर्वसामान्य माणसाला किमान आवाज मिळतो आहे.
 सोशल मीडियामुळे पत्रकारितेतील मक्तेदारी संपुष्टात आलेली असली तरीही वर्तमानपत्र हे विश्लेषणाची विश्वासार्ह जागा असल्यामुळे वाहिन्यावरील  बातम्यांचे अँकर वर्तमानपत्राच्या संपादकाला फोन करून तुमचे विश्लेषण काय ?  असे विचारतात  लोकांना वाटतं त्याचे महत्त्व मोठेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे माध्यमातून एवढ्या वेगाने विस्तारत असताना भारतातील माणसाचे वर्तमानपत्राचे महत्त्व आणि प्रेम टिकून आहे आजही वर्तमानपत्रांचा खप बऱ्यापैकी टिकून आहे याला कारण वर्तमान पत्र वाचल्याशिवाय सकाळ सुरू होत नाही माध्यमांचा तो इतिहास आहे इतक्या वर्षांचा त्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा आवाज होण्याच काम पत्रकारिता करू शकते. सध्याचा काळ कठीण आहे कारण  अडवणूक करणारा हा सोडवणूक करणाऱ्या पेक्षा मोठा होत  चालला आहे अशावेळी सोडवणूक करण्याची भूमिका माध्यमांची पत्रकाराची असते.
संजय आवटे म्हणाले २२ वर्षांपूर्वी स्वर्गीय शंकरराव काळे म्हणाले होते संवादाशिवाय विकास होत नाही सर्वसामान्य माणसे या ठिकाणी उभी राहिले कारण तुमच्यासारखी पत्रकार मंडळी आमच्या सोबत होती  सर्वसामान्य माणूस हा आपला बातमीचा केंद्रबिंदू असला पाहिजे  जिथे प्रश्न आहे तिथे पत्रकाराने उभे राहिले पाहिजे असे आव्हान त्यांनी शेवटी केले.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरणारे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे आधी सर्व संचालक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन काळे कारखान्याचे माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले, तर आभार संचालक  सुधाकर रोहम यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page