क्रीडाक्षेत्र: संजीवनी अभियांत्रिकीचा बेसबॉल संघ जिल्ह्यात पहिला
Sports: Sanjeevani Engineering’s baseball team is the first in the district
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue10 Jan23 , 16.00 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगांव: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाच्या संजीवनी अभियांत्रिकीच्या मैदानावर झालेल्या आंतर महाविद्यालयीन विभागीय बेसबॉल स्पर्धेत क्रीडा स्पर्धेत बलस्थान असलेल्या प्रबळ दावेदार संजीवनी अभियांत्रिकीच्या बेसबॉल संघाने पहिले स्थान पटकावले आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे मॅनेजिंग ट्रस्ट अमित कोल्हे यांनी बेसबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ. डी. बी. क्षिरसागर, क्रीडा संचालक डी. एन. सांगळे व सर्व शारीरिक शिक्षक , विविध महाविद्यालयांमधुन आलेले क्रीडा प्रतिनिधी व खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धासाठी अहमदनगर जिल्ह्यातील आठ संघांनी हजेरी लावली. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व के.जे. सोमय्या महाविद्यालय यांच्यात अंतिम सामना रंगला. या अटीतटीच्या सामन्यात संजीवनीच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाविरूध्द ८-६ अशा धावांनी विजय मिळवुन विजयाची मोहर उमटवली आणि जिल्ह्यात बेसबॉल खेळात अव्वल असल्याचे सिध्द केले.

संजीवनीच्या संघात अभिजीत पोपळघट, सुजय पवार, प्रणित बोरकर, विपुल वने, ओमकार सांगळे, अमोल गर्कळ, हर्षल गंगवाल, महेश जाधव, साहील शेख , वैभव सांगळे, धनेश लवांडे, अथर्व मदाने, अथर्व गर्जे, विशाल कराड, मुस्ताकिम सय्यद व अथर्व खर्डे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या सर्व खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक गणेश नरोडे, शिवराज पाळणे, डॉ. परीमल कचरे, करण भांभु व अक्षय येवले यांचे मार्गदर्शन लाभले.
सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीतील विभागीय पातळीवरील अहमदनगर, नाशिक व पुणे जिल्ह्याच्या संघांची आता आंतर विभागीय सामने नाशिक येथे होणार असुन कोपरगांव येथेच विविध संघातुन चुनुकदार खेळाडू हे अहमदनगर संघासाठी निवडण्यात आले. यातही संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा खेळाडूंची निवड झाली.
संजीवनी ग्रप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित केाल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
संजीवनी ग्रप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित केाल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.