जम्प रोप राज्यस्तरीय स्पर्धेसाठी  संघाची निवड चाचणी – संदीप कोयटे

जम्प रोप राज्यस्तरीय स्पर्धेसाठी  संघाची निवड चाचणी – संदीप कोयटे

Team Selection Test for Jump Rope State Level Competition – Sandeep Koyte

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue10 Jan23 , 16.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : सिंदखेड राजा येथे होणाऱ्या जम्प रोप स्पर्धेच्या  जिल्ह्यातील वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांची निवड चाचणी १४ जानेवारी रोजी कोपरगाव  समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये दोन वयोगटात  होणार असल्याची माहिती  जिल्हा जम्प रोप असो.चे अध्यक्ष संदीप कोयटे  यांनी दिली.

 संदीप कोयटे पुढे म्हणाले   १६ व   १८ वयोगट या दोन गटात होणार असून दोन संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे  सांघिक प्रकारात ३० सेकंद स्पीड रिले आणि ३० सेकंद डबल अंडर रिले तर वैयक्तिक प्रकारात फ्री स्टाईल, ३० सेकंद स्पीड, डबल अंडर, ०३ मीटर इनडोअर या प्रकारात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकाची जन्मतारीख १६ वर्षाखालील गटासाठी १/१/२००५ नंतरची असावी तर १८ वर्षाखालील गटासाठी १/१/२००३ नंतरची असावी. प्रत्येक सहभागी स्पर्धकाने स्वतःची स्पोर्ट किट सोबत आणणे आवश्यक आहे. 
जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी जम्प रोप स्पर्धेच्या निवड चाचणीत सहभागी व्हावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे कार्याध्यक्ष  दिलीप घोडके यांनी केले.
      या निवड चाचणीत सहभागी  होणाऱ्या संघ आणि स्पर्धकांनी १३  जानेवारी २०२३ पर्यंत दुपारी २:०० वाजेपर्यंत संघाची व वैयक्तिक नोंदणी करावी.अधिक माहितीसाठी समता इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडा शिक्षक . रोहित महाले (९७६७७४६२३४) तर अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे  श्री. नितीन निकम (९९६०८०१०५५) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

You cannot copy content of this page