कोपरगाव गोदाकाठ: ७५लाख उलाढाल; महोत्सवाची सांगता                              

कोपरगाव गोदाकाठ: ७५लाख उलाढाल; महोत्सवाची सांगता

Kopargaon Godakath: 75 lakh turnover; End of the festival 

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue10 Jan23 , 16.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव  – शुक्रवारी सुरू झालेल्या कोपरगाव गोदाकाठ महोत्सवाची   सोमवारी सांगता झाली. चार दिवसात सुमारे ७५ लाखापर्यंत उलाढाल महोत्सवातून झाल्याने महिला बचत गटांना उभारी मिळाली असल्याचे प्रतिपादन आयोजक प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई यांनी पुष्पाताई काळे यांनी समारोप प्रसंगी केले. 

महिला बचत गटाच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवात कृषी साहित्य, तयार पापड, लोणचे, सौंदर्य प्रसाधने, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी, सर्व प्रकारची मसाले, सुगंधी अगरबत्ती, गृह सजावट विविध प्रकारच्या खाण्याचे स्टॉल कलागुण सादर करण्यासाठी   व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. गोदाकाठ महोत्सवाने गर्दीचा उच्चांक गाठण्याबरोबर  विक्रीच्या उलाढालीचा विक्रमही मोडीत काढला.  त्यामुळे दोन वर्ष बचत गटाच्या महिलांपुढे निर्माण झालेले आर्थिक संकट दूर होण्यास मोठी मदत झाली आहे.

गोदाकाठ महोत्सवाची वाढलेली व्याप्ती पाहता पुढील वर्षी यापेक्षा जास्त भव्य-दिव्य नियोजन करणार असल्याचे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैताली काळे यांनी सांगितले आहे.

  सर्व बचत गटाच्या स्टॉल्स धारकांचा  सौ.पुष्पाताई काळे, आ.आशुतोष काळे व  सौ. चैताली काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Leave a Reply

You cannot copy content of this page