अथर्व खेमनर ८ वी शिष्यवृत्तीत राज्यात ६ वा
6th in State in Atharva Khemner 8th Scholarship
शिष्यवृत्ती परीक्षेत शारदा इंग्लिश मिडीयमचा राज्यात झेंडाSharda English Medium Flag in State in Scholarship Examination
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue10 Jan23 , 19.00 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी अथर्व देवराम खेमनर याने महाराष्ट्र राज्यातून (शहरी विभाग)६वा क्रमांक पटकावित शाळेचा झेंडा राज्यात फडकविला आहे.
यावर्षी विद्यालयातून इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कु.स्वरा शिंदे २९८ पैकी २२२ गुण, कु.सृष्टी वावधाने २१२ गुण तसेच कु. ग्रीष्मा कांबळे हिने २०४ गुण मिळवत तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या परीक्षेत इयत्ता पाचवी मधून २१ विद्यार्थी- विद्यार्थिनी पात्र झाले असून तीन विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना सौ.शिल्पा खांडेकर, सुनंदा कदम, सोनल निकम व माधुरी भस्मे आदींचे मार्गदर्शन लाभले.
तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा विद्यार्थी अथर्व देवराम खेमनर राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत सहाव्या स्थानावर विराजमान झाला असून इंग्रजी माध्यमातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान त्याने मिळवला आहे . या परीक्षेत विद्यालयातून इयत्ता ८वी चे १८ विद्यार्थी पात्र झाले असून एक विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकला आहे.सदर विद्यार्थ्यांना स्वरूपा वडांगळे, अर्चना बाजारे, सीमा शिंदे, माधुरी भस्मे, सर्वश्री.गणेश मलिक,नारायण गाडेकर ,रणजित खळे, आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उत्तुंग यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी शबाना शेख मॅडम,प्रशासनाधिकारी श्री.पटारे ,केंद्रप्रमुख राजेंद्र ढेपले,विलास भांड,श्रीम.विद्या भोईर, शालेय स्थानिक समितीचे अध्यक्ष . सुहास गोडगे सर, प्राचार्य .के.एल.वाकचौरे सर उपप्रचार्या सौ.एस.ए. अमृतकर मॅडम, पर्यवेक्षिका सौ.पहाडे मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post Views:
166