स्वर्गीय शंकरराव कोल्हे समाजासाठी जगले म्हणून  समाजाच्या आठवणीत राहिले – भास्करराव पेरे

स्वर्गीय शंकरराव कोल्हे समाजासाठी जगले म्हणून  समाजाच्या आठवणीत राहिले – भास्करराव पेरे

Late Shankarao Kolhe lived in the memory of society as he lived for society – Bhaskar Rao Pere

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu12 Jan23 , 17.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांनी  या भागाला संजीवनी दिली.  माझ्याकडे  आहे ते समाजाला मला द्यायचं आहे, शेवटपर्यंत द्यायचं आहे, ही भावना त्यांच्याकडे होती. त्यांनी माणसात देव पाहिला ते समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले समाजाने त्यांच्या आठवणी ठेवल्या असल्याचे गौरव उद्गार औरंगाबाद जवळ असलेल्या आदर्श गाव पाटोदाच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी  बुधवारी (११) रोजी कोपरगाव कलश मंगल कार्यालयातील  नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्य  १२२ खादी ग्रामोद्योग सोसायटी ११ जेऊर कुंभारी सोसायटी १३ निवडणुकीस उभे राहिलेले उमेदवार अशा २५७ जणांचा सन्मान करण्यात आला.अध्यक्षस्थानी  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे  कारखान्याचे संचालक त्रंबकराव सरोदे होते. प्रास्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केले

प्रारंभी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे म्हणाले की, एकमेकांचे उणे दुणे काढणे हे ग्रामपंचायत निवडणुकीत अनुभवायला मिळाले. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांचे पाठबळ घेवुन मतदार संघात काम करत आहे. मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी करावे, महिला ही एक शक्ती आहे. महिलामंडळ ते विधीमंडळ अशी संधी मिळालेल्या सौ. स्नेहलता कोल्हे यांचे मार्गदर्शन स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रथमच निवडुन आलेल्या महिलांनी घ्यावे. जल जीवन मीशन अंतर्गत २७७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असेही ते म्हणाले.  
भास्करराव पेरे पुढे म्हणाले,शंभर वर्ष आपल्या गावातला माणूस जगला पाहिजे हे एकच सूत्र डोळ्यासमोर ठेवा ग्रामपंचायत सार्वभौम संस्था असून सरपंच हा सर्वात मोठा लोकप्रतिनिधी आहे. सरपंचांनी आपले अधिकार वापरताना सेवावृत्तीने काम केले पाहिजे. काळ आणि प्रसंग बघून निर्णय घेतले पाहिजेत. केवळ लोकांना बरे वाटेल असे निर्णय न घेता काही धाडसी निर्णय घेऊन गावाला शिस्त लावावी असा सल्ला त्यांनी दिला आहे. 
पेरे पुढे म्हणाले, ‘देश महासत्ता करण्यासाठी गावे स्वच्छ समृद्ध आणि स्वयंपूर्ण केले पाहिजे. तसेच आर्थिक नियोजन बारकाईने करा. नागरिकांना उत्तम सुविधा झाली तर नागरिक कर द्यायला मागे राहत नाही. हे आम्ही आमच्या पाटोदा गावी सिद्ध केले आहे.प्रत्येक गावात विकासाच्या आड येणाऱ्या प्रवृत्ती असतात. त्यामध्ये निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आघाडीवर असतात. अशा प्रवृत्ती दुर्लक्षित करूनच विकास साधला पाहिजे.खेड्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल  पण त्यासाठी त्या गावाची आणि गावाचे नेतृत्व करणाऱ्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. सरपंच गावाच्या विकासासाठी नवे कायदे करू शकतो.फक्त त्यामध्ये खाजगी स्वार्थ नको. ग्रामसभेने जर चांगले निर्णय घेतले तर तुमचेही गाव पाटोदाहुन चांगले आणि विकसित बनू शकते.
आमदार खासदार नेते पैसे देऊ शकतील पण गाव सुधारण्याचे काम सरपंचालाच करावे लागेल.गावाचे सरपंच आणि सदस्य हे त्या गावाचे विठ्ठल रुक्मिणी असतात, तर गाव त्यांचे पंढरपूर. विरोधकाकडे लक्ष देण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी झटले तर गावाचा काया पालट नक्की होईल असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
या सत्कार सोहळ्यास मनेष गाडे, सतिष आव्हाड, विलास वाबळे, निवृत्ती बनकर, ज्ञानेश्वर परजणे, बापूराव बारहाते, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर होन, निलेश देवकर, बाळासाहेब पानगव्हाणे, अरूण येवले, रमेश आभाळे, विलासराव माळी, कैलास माळी, उषा संजय औताडे, प्रदिप नवले, मधुकरराव वक्ते, मोहनराव वाबळे, केशव भवर, नारायण अग्रवाल, बापू सुराळकर, वैशाली आढाव, शिल्पा रोहमारे, विद्या सोनवणे, सुनील देवकर, संजय सातभाई, अतुल काले, योगेश बागुल, दत्ता काले, अशोक औताडे यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी सदस्य सहकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे  कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन माजी सभापती शिवाजीराव वक्ते यांनी केले.

चौकट

पाणी, फळांचे झाडे, मुलांचे शिक्षण, स्वच्छता, ज्येष्ठ वयोवृद्धांसाठी दत्तक योजना या पंचसूत्री वर गाव विकासाचा गाडा जोमाने पुढे न्या. ग्रामपंचायतमार्फत शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर घेऊन त्यातून काम करा विकासाची यशोगाथा असल्याचे भास्करराव पेरे म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page