सत्ता बदल : कोपरगाव कारागृहाच्या धोकादायक इमारतीत कैद्यांच भवितव्य; नव्या कारागृहाचा प्रस्ताव अडकला लाल फितीत

सत्ता बदल : कोपरगाव कारागृहाच्या धोकादायक इमारतीत कैद्यांच भवितव्य; नव्या कारागृहाचा प्रस्ताव अडकला लाल फितीत

Change of power: Fate of inmates in dangerous building of Kopargaon Jail; The proposal for a new jail is stuck in red tape

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed18Jan23 , 18.50 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव  : सुविधायुक्त कारागृह हा कैद्यांचा हक्क आहे. खेळती,  हवा, उजेड, स्वच्छता व पाणी यासह दैनदिन प्राथमिक सुविधा सर्वांना मिळावी यासाठी राज्यातील अनेक तालुक्याच्या ठिकाणी कारागृहाच्या सुविधा युक्त  नवीन इमारती  बांधण्यात आल्या आहेत. मात्र, कोपरगाव येथे  आधुनिक तहसील कार्यालयाच्या नजीक  ब्रिटिशकालीन   कौलारू इमारत धोकादायक असताना त्याच  इमारतीच्या कारागृहात  कैदी ठेवण्याचे काम सुरू आहे.गेल्या दोन वर्षापासून सात कोटीच्या दोन मजली अत्याधुनिक  कारागृहाचा प्रस्ताव सत्ता बदलामुळे शासनाच्या लालफितीत अडकला आहे.

वास्तविक, कारागृहाच्या  भिंती खराब झाल्या आहेत. फरशी उखडली आहे. कौलारू छत असलेल्या इमारतीचे छताचे तुकडे पडत आहेत तर इमारतीचे खांब निकामी झाल्याने केवळ सळईचा आधार उरला आहे. 
ब्रिटिश कालीन इमारतीतील  मोडकळीस आलेल्या दुय्यमकारागृहात सातत्याने  असलेल्या शेकडो  कैद्यांच्या जीविताचा विचार करता या कारागृहाचे नूतनीकरण व्हावे, दोन मजली इमारत व्हावी म्हणून तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे व विद्यमान आमदार  आशुतोष काळे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याची दखल घेत शासनाने व सार्वजनिक बांधकाम अहमदनगर विभागाने सहा कोटी ३३ लाख २६ हजार रुपये किमतीचा तहसील कार्यालय आवारात सब जेल बांधकाम करण्यासाठी ३० मार्च २०२२ ला प्रस्तावही सादर केला होता, शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला, मात्र सत्ता बदलामुळे हा प्रस्ताव पुन्हा एकदा लाल फितीत अडकला आहे.                   
येथील तहसीलदार कचेरीची कोट्यावधी रुपयाची सर्व सुविधांनी युक्त अशी तीन मजली इमारत दिमाखाने उभी आहे. त्या नजीक असलेले ब्रिटिशकालीन दुय्यम कारागृह आहे त्या स्थितीत आजही उभे आहे, ते पूर्णतः मोडकळीस आले आहे, एकूण पाच बराकी आहेत, वीस कैदी क्षमता असलेल्या कारागृहात सध्या ९४ कैदी अक्षरशः कोंबण्यात आले आहेत. त्यामुळे कैद्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.         
 दोन मजली आधुनिक कारागृहाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे  त्यात तळमजला ४८८.७१ चौरस मीटर, पहिला मजला ४०७.९३ चौरस मीटर असे आशयाचे प्रस्तावित बांधकाम करावयाचे होते, त्याबाबतचे संबंधित नकाशे चतुसीमा, अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर बांधकाम, बीम कॉलम फ्लोरिंग, टाइल्स रस्ते पार्किंग आदी सोयी सुविधा येथे आवश्यक करणार येण्यात होत्या, मात्र हा प्रस्ताव लाल फितीत अडकल्याने पुन्हा बारगळला गेला आहे.                
  कोपरगाव तालुक्यात या दुय्यम कारागृहात लोणी, प्रवरानगर, राहता, शिर्डी, कोपरगाव आदी ठिकाणचे कैदी ठेवण्यात येतात, त्यांना ने आण करणे पोलीस बळ लागते, वेळ खर्च होतो, जुनाट झालेले दुय्यम कारागृह वर्षानुवर्ष या कारागृहाचे काम रखडले गेले आहे. हे दुय्यम कारागृह खतरनाक आरोपींनी दोन वेळा फोडण्याचा प्रयत्न करून पलायन केले होते, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डाग डुजी केली, जाळ्या वगैरे बसवल्या, मात्र क्षमतेपेक्षा चार पट ज्यादा कैदी येथे ठेवले जात असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे. पोलिसांना डोळ्यात तेल घालून कामगिरी बजवावी लागते. तसेच या कारागृहाला सध्या तहसील कार्यालयात अव्वल कारकून असलेले चंद्रशेखर कुलथे यांना सब जेलर म्हणून अधिक काम पाहावे लागते. त्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर क्षमतेपेक्षा जादा कैदी झाल्याने वारंवार पत्रव्यवहार करून एकदा पन्नास आरोपी व एकदा तीस आरोपी नाशिक जेलमध्ये पाठवले होते, मात्र सध्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत असल्याने आरोपींची संख्या वाढत आहे, मात्र ते ठेवायला बराकिंची संख्या वाढली जात नाही त्यामुळे विविध प्रश्न निर्माण होतात, सध्या ९४ आरोपी येथे आहेत ते सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. त्यातील काही कैदी आजारी पडतात त्यामुळे त्यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण होतो. आता त्यातील ३५ आरोपी पुन्हा वर्ग करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

 चौकट.                                           

सब जेलरचे पद निर्माण करावे…                   नगर जिल्ह्यात जेथे जेथे सब जेल आहे तेथे स्वतंत्र दर्जाचे सब जेलर दर्जाचे पद आहे, मात्र कोपरगाव येथील दुय्यम कारागृह सब जेलरचे पद स्वतंत्र नाही त्यामुळे ते पद निर्माण करावे म्हणजे त्याचा पदभार स्वतंत्र राहील अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page