कोपरगावात पतंगबाजीवरून दोन गटात तुफान राडा; शहर पोलिसात १० जणांवर गुन्हे दाखल

कोपरगावात पतंगबाजीवरून दोन गटात तुफान राडा; शहर पोलिसात १० जणांवर गुन्हे दाखल

Two groups clash over kite flying in Kopargaon; A case has been filed against 10 people in the city police

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue17Jan23 , 17.50 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव  : शहरातील मोहिनीराज नगर भागात मकर संक्रांतीच्या दिवशी  पतंगबाजी वरून येथीलच दोन गटात  राडा झाला होता याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा  दाखल केला होता. मात्र हा वाद इतका टोकाला गेला की तुफान हाणामारी पर्यंत हे प्रकरण केले . या हाणामारीत  तीन जण  जखमी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई करत दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून   दरम्यान सर्वजण फरार झाले आहेत .

रविवारी (१५) रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी मोहीनीराजनगर  येथे दोन गटांमध्ये पतंग उडवण्यावरून वाद झाला. या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली होती. सदर तक्रारीच्या राग धरून सोमवारी (१६)  रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास हा वाद इतका टोकाला गेला की, तुफान हाणामारी पर्यंत हे प्रकरण गेले . या हाणामारीत  लोखंडी पाईप,  लोखंडी रॉड,व  लाकडी दांडके यांनी हाणामारी करण्यात आली. यात फिर्यादी गणेश नारायण पंडोरे (३५) यासह सुरज उर्फ सोन्या कैलास आव्हाड व माजी नगरसेवक अनिल विनायक आव्हाड उर्फ कल्लूआप्पा हे तीन जण  जखमी जखमी झाले आहेत. जखमींवर कोपरगाव ग्रामीण रुग्णालय डॉक्टर मुळे हॉस्पिटल व एस जी एस हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच काही मिनिटात पोलीस पथक घटनास्थळी पोहोचल्या मुळे मोठा अनर्थ टाळला . 
वरीष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या बरोबर पथक यांच्या पथकात पोसई रोहिदास ठोंबरे, पोसई भरत दाते, पोसई संजय पवार, पोहेकॉ.राजू पुंड, पो कॉ. राम खारतोडे, पो कॉ.संभाजी शिंदे,  पो कॉ.गणेश काकडे  पोलीस नाईक  अर्जुन दारकुंडे आदीसह पोलीस कर्मचारी  होते. 
 याप्रकरणी गणेश नारायण पंडोरे यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे. सदर फिर्यादीवरून समोरील सहा व इतर अनोळखी चार अशा  दहा जणांवर भादवि कलम ३२६,१४३,१४७, १४८,१४९, ३२३,५०४,५०६  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वजण फरार आहेत. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार हे  पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page