टाकळी शिवारात बिबट्याचे बछडे विहिरीत पडलं .. 

टाकळी शिवारात बिबट्याचे बछडे विहिरीत पडलं .. 

A leopard calf fell into a well in Takli Shiwar.

तब्बल वीस तासाने बाहेर काढण्यात यश.. वन अधिकाऱ्यांशी स्थानिक शेतकऱ्यांचे झाले वादविवाद Succeeded in pulling out after about twenty hours.. Local farmers had a debate with the forest officials

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 2Feb23 , 21.00 Pm
By राजेंद्र सालकर  

कोपरगाव : दिवसेंदिवस जंगलाची संख्या कमी होत असल्याने जंगली प्राण्यांनी भक्ष्याच्या शोधा साठी आपला मोर्चा नागरि वस्तीकडे वळवला आहे.  असाच बिबट्या हा जंगली प्राणी नागरी वस्तीत येऊन धमाकूळ घालत पाळीव प्राणी व माणसावर हल्ला केल्याच्या बातम्या रोज आपणास ऐकण्यास, पाहण्यास व वाचण्यात येतात याला कोपरगाव तालुका ही अपवाद नाही. कोपरगाव तालुक्यात अनेक गावात बिबट्याने धमाकुळ घातला असून अनेक पाळीव जनावरांना त्याने आपले शिकार बनवले आहे.

विशेष करून तालुक्यातील टाकळी व टाकळी शिवारात या घटनेनंमध्ये वाढ झाली असून यामुळे येथिल नागरिक, ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात जगत आहे. आज गुरुवारी दिनांक २ फेब्रुवारी  रोजी तालुक्यातील टाकळी शिवारातील रामदास केदू देवकर यांच्या शेजारी डॉक्टर वृषाली स्वानंद टिळेकर यांच्या विहिरीची मोटार 
बाबासाहेब ढगे हे सकाळी नऊ वाजता चालू करण्यासाठी गेला असता त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता एक
बिबट्याचे बछडे पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने त्याना धक्काच बसला त्यानंतर त्यांनी गावातील ग्रामस्थ यांना तसेच वन अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत माहिती दिली असता वन अधिकाऱ्यानी घटनास्थळी धाव घेत बाजीच्या सहाय्याने व शेतकऱ्यांच्या मदतीने त्या बिबट्याच्या पिल्लाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक वेळा सदर बछडे पुन्हा पाण्यात पडल होते विहीर अधिक खोल असल्याने सर्वच प्रयत्न निष्पळ ठरत होते तब्बल चार ते पाच तासांच्या प्रयत्नानंतर शेतकरी व वन अधिकारी यांच्या प्रयत्न यश मिळाले असून  बिबट्यास जीवदान मिळाले खरे मात्र त्या बिबट्याने सर्वांची नजर चुकवन धूम ठोकली आहे.
दरम्यान वनविभाग आणि टाकळी शिवारातील ग्रामस्थ यांच्यात बिबट्या वरून मोठे वादंग झाले असून सदर बिबट्याच्या पिल्लाला  पिंजऱ्यात जेरबंद करून बिबट्याचा बंदोबस्त करावा मात्र असे केल्यास सदर  बिबट्याच्या बछडे आई अधिक आक्रमक होईल असे मत वन अधिकारी यांनी व्यक्त केले आहे.             
सकाळी ११ वाजता वन अधिकाऱ्यांना कळविले २ वाजता रिकाम्या हाती दोन कर्मचारी आले आणि त्यांना सर्व साहित्य शेतकऱ्यांना आणून द्यावे लागले असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी संगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page