जिंकण्यासाठी संघर्ष करावाच लागेल- शिवव्याख्याते गणेश भोसले
One has to struggle to win – Ganesh Bhosale, Shiv Vyakhya
स्व.सौ.सुशीलामाई काळे वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण Ms. Sushilamai Kale Oratorical Competition Prize Distribution
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 4Feb23 , 19.00 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे यांनी रयतच्या शिक्षण प्रसार व प्रचारात स्वतःला वाहून घेतले. त्यामुळे येथे शिकणे ही अभिमानाची गोष्ट आहे. वेळेला महत्व द्या प्रामाणिक राहा वेळेला महत्त्व द्या जिंकण्यासाठी संघर्ष करावाच लागेल असे प्रतिपादन शिवव्याख्याते गणेश भोसले यांनी कोळपेवाडी येथील एका कार्यक्रमात केले. पाण्यासाठी काळे परिवाराचे योगदान असल्याचे ते यावेळी म्हणाले,
स्व.सौ.सुशीलामाई काळे २३ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते शनिवारी पारितोषिक देण्यात आली.
या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे लहान गट प्रथम कु.भक्ती संदीप पवार, द्वितीय कु. वैदेही सतीश कुंभकर्ण, तृतीय संचित योगेश निर्मळ, उत्तेजनार्थ कु. सृष्टी साईनाथ चौधरी, मध्यम गट प्रथम कु.श्रुती राजेंद्र शितोळे, द्वितीय कु. क्षितिजा संदीप घोलप, द्वितीय कु. कस्तुरी योगेश सोनवणे, तृतीय कु. ईश्वरी विजय वाकचौरे, उत्तेजनार्थ कु. श्रद्धा संजय वेताळ, मोठा गट प्रथम कु.वृषाली गंगाराम घुले, द्वितीय कु. श्रेया राम शेळके, द्वितीय कु. ईश्वरी विठ्ठल निंबाळकर, तृतीय कु. सिद्धी दत्त्तात्रय दुधव व उत्तेजनार्थ कु. मानसी किरण काळे यांनी पारितोषिक पटकाविले.
यावेळी संभाजीराव काळे, माजी संचालक अरुण चंद्रे, स्थानिक स्कुल कमिटी सदस्य कचरु कोळपे, भाऊसाहेब लूटे, डॉ.आय.के.सय्यद, बाळासाहेब ढोमसे, प्राचार्या सौ. छाया काकडे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे, छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, शिक्षक, विद्यार्थिनी, पालक संघ प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक सुरेश खंडिझोड यांनी केले. सुत्रसंचलन श्रीमती रोहिणी म्हस्के, सिद्धार्थ कांबळे यांनी केले तर आभार संजय राऊत यांनी मानले.