प्रत्येक दिव्यांगाला प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मानस – आ. आशुतोष काळे

प्रत्येक दिव्यांगाला प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मानस – आ. आशुतोष काळे

Intention to get certificate for every disabled person – Aa. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 9 Feb23 , 9.10 Am
By राजेंद्र सालकर

कोपरगाव:दिव्यांग प्रमाणपत्राशिवाय शैक्षणिक असो की शासकीय योजना लाभ मिळू शकत नाही.  यासाठी त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देवून त्यांचे जीवन सुखकर करण्याचा मानस असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. 

मागील दोन वर्षापासून अहमदनगर येथे जाण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या वाहन व्यवस्थेमुळे दिव्यांगांना विविध शासकीय  योजनांचा लाभ मिळण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र मिळणे सुलभ झाले  

दिव्यांग व्यक्ती दिव्यांग प्रमाणपत्रासाठी रांगेत तासन तास ताटकळत उभ्या असतात. त्यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांना अहमदनगर येथे येण्या-जाण्यासाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

यावेळी  सुधाकर रोहोम, गोपीनाथ रहाणे, किरण होन, विलास चव्हाण, योगेश गंगवाल आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page