समता राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धा; मुला – मुली दोन्ही गटात ९८ सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र अव्वल स्थानी
Parity National Jump Rope Competition; Maharashtra tops the list by winning 98 gold medals in both boys and girls categories
समता कडून आम्हा कोपरगावकरांचा सन्मान – .विवेक कोल्हे, Respect from Samata to our Kopargaoners – Vivek Kolhe,
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 9 Feb23 , 9.00 Am
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : १६ राज्यातील ४५० स्पर्धक सहभागी झाले होते. सहभागी संघांपैकी सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात मुलां- मुलीमध्ये ९८ सुवर्ण , ६४ रजत , ९३ कांस्य पदके मिळवून महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला. २४ सुवर्ण ,१८ रजत , १४ कास्य पदके मिळवून हरियाणा द्वितीय स्थानावर राहिला तर तसेच आंध्र प्रदेश संघातील स्पर्धकांनी १९.सुवर्ण , ४६ रजत , ६८ कांस्य पदके मिळवून आंध्र प्रदेश तिसऱ्या स्थानावर राहिले व २० सुवर्ण २४ रजत , १४ कांस्य पदके मिळविणारे मिळविणारा मध्य प्रदेश चौथ्या स्थानावर राहिला,
डेमो सादरीकरणात मध्यप्रदेश प्रथम तर महाराष्ट्र दुस-या तर छत्तीसगड तिसऱ्या स्थानावर राहिला असल्याची माहिती आयोजकाकडून देण्यात आली.
जंम्प रोप या खेळाला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यामुळे देशाचे नाव उंचावण्यात या खेळाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.ग्रामीण भागात राष्ट्रीय पातळीवरील जंम्प रोप स्पर्धांचे आयोजन करून समता इंटरनॅशनल स्कूल ने आम्हा कोपरगावकरांचा सन्मान केला असल्याचे गौरवउद्गार सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात व्यक्त केले.
यावेळी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेत अनेक रेकॉर्ड ही झाले. ३ मिनिट इंडूरन्स या प्रकारात जम्प मारण्याचा ४१४ जम्पचे रेकॉर्ड होते.ते रेकॉर्ड महाराष्ट्र संघातील रुद्र तोंडवाल याने ४४८ जम्प मारत मोडीत काढले. नवीन रेकॉर्ड केल्याबद्दल त्याला अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशनच्या वतीने ट्रॅक सूट आणि रोख ४ हजार रुपये रोख देण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने जास्तीत जास्त पदके मिळवत मुल व मुलींच्या संघाने जनरल चॅम्पियनशिप मिळविली आहे. परिक्षक म्हणून धर्मेश परमार (गुजरात), राजेंद्र प्रसाद (तेलंगणा), आरिफ खान (राजस्थान), मुकुंद झोला (मध्य प्रदेश), उत्पल बोरा (आसाम), गोपेश चांदणी (छत्तीसगड), पवन सिंग व डॉक्टर सीमा पवनगोत्रा (जम्मू काश्मीर) म्हणून काम पाहिले.
डिजिटल टेक्नॉलॉजीच्या युगात मोबाईलला हात न लावता सलग तीन दिवस स्पर्धेत लक्ष केंद्रीत करून जम्परोप स्पर्धेत संपादन केलेले यश कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार समता स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयते यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.
यावेळी जिल्हा जंम्प रोप अध्यक्ष दिलीप घोडके,व हरियाणा जम्प रोप असो.चे सेक्रेटरी बिरसिंग आर्या यांनी तीन दिवसांच्या या स्पर्धेत जेवण व निवासाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे व जिल्हा जम्प रोप असो.चे अध्यक्ष . संदीप कोयटे यांचे कौतुक केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमास समता चरित्रेबल ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे,भारतीय जम्प रोप महासंघाचे अध्यक्ष .तौसिफ लारी, गट शिक्षणाधिकारी सौ.शबाना शेख, शाजाद खान, अशोक दुधारे, दिपक निकम, पांडुरंग रणमाळ, राजेंद्र झावरे, आकाश नागरे, संदीप वर्पे, सुनील गंगुले, शिव शेषनारायण लोढे, आदी मान्यवर हजर होते.
स्पर्धा यशस्वीतेसाठी चंद्रकांत शेजुळ , बाबासाहेब गवारे, नितीन निकम , निवृत्ती मुरडणर, रोहित महाले ,कार्तिक मोरे, राहुल रुईकर, सार्थक बडजाते, आर्यन घोडके, श्लोक कोताडे, मल्हार देवकर, अखिलेश ठोंबरे, अर्णव वाबळे , तन्मय साबळे, दीपक जयभाये, समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय व सुत्रसंचालन उपप्राचार्य समीर अत्तार यांनी व आभार शिवप्रसाद घोडके यांनी मानले.
Post Views:
145