ज्ञान कर्तुत्वाने सिद्ध केल्यास लोक नतमस्तक होतात – बिपिनदादा कोल्हे
If knowledge is proved by action, people bow down – Bipindada Kolhe
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. काॅलेजमध्ये वार्षिक स्नेह संम्मेलन संपन्नSanjeevani Military School and Jr. Annual Sneh Sammelan held in the college
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 9 Feb23 , 9.30 Am
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगांव: कोणत्याही व्यक्तीची उंची शारीरिक उंचीवरून नव्हे तर कर्तुत्वावरून ठरते. तेव्हा ज्ञान कर्तुत्वाने सिद्ध केल्यास लोक नतमस्तक होतात असे विचार संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या २३ व्या वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून केले.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतशिल शेतकरी, उद्योजक, कवी, लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्व सुरेश कोल्हे हे होते.
सदर प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे, सचिव ए. डी. अंत्रे, नाॅनअकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य डाॅ. जी. बी. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. कैलास दरेकर व्यासपीठावर उपस्थित होते. पालक व विद्यार्थ्यांची उपस्थितीही उल्लेखनिय होती.
बिपिनदादा कोल्हे पुढे म्हणाले की
नेपाळच्या गंडकी नदी मधील शाळीग्रामातून जेव्हा अयोध्येतील रामाची मूर्ती घडेल तेंव्हा लाखो श्रद्धाळू नतमस्तक होतील तसेच शिक्षणात वेगवेगळ्या संस्कारातून घडलेले विद्यार्थी आपले कर्तृत्व सिद्ध करतात तेव्हा समाज त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. पालक शिक्षणासाठी आपल्या पाल्याला काही कमी पडू देत नाही तेव्हा पाल्याने सुद्धा त्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या संधीचे सोने करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बिपिनदादा कोल्हे म्हणाले शिस्त हाच सैनिकी स्कूल चा गाभा आहे सातारा येथील पहिले सैनिकी बॅचचे विद्यार्थी असलेले आजचे प्रमुख पाहुणे सुरेश कोल्हे हे त्या शिस्तीतून तयार झाल्यामुळे आजही वयाच्या ७० व्या वर्षी तरुणाला लाजवेल असे काम करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत असल्याचे गौरव द्वार व्यक्त केले
माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण विद्यार्थी शिकला पाहिजे या तळमळीतूनच संजीवनी शैक्षणिक संकुलाची उभारणी केली असे सांगुन श्री कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सुरेश कोल्हे म्हणाले की, जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वार्मिंग) यातून वसुंधरा वाचविण्यासाठी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन केल्यास धरतीवर स्वर्ग निर्माण होईल असे त्यांनी व्यक्त केले.
सुमित कोल्हे म्हणाले की संजीवनी शिक्षण संस्थेला ४० वर्षांची यशस्वी शैक्षणिक परंपरा आहे. प्रत्येक विध्यार्थी येथुन चांगला घडला पाहीजे, यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कटीबध्द आहोत.
सुमित कोल्हे म्हणाले की संजीवनी शिक्षण संस्थेला ४० वर्षांची यशस्वी शैक्षणिक परंपरा आहे. प्रत्येक विध्यार्थी येथुन चांगला घडला पाहीजे, यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कटीबध्द आहोत.
उपप्राचार्य प्रा. दरेकर यांनी अहवाल वाचन करून प्रगतीचा आलेख मांडला. मिलीटरी बॅन्ड, सुंदर रंगमंच, उत्तम ध्वनी व्यवस्था व लायटींग आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम, इत्यादी बाबी या सम्मेलनाचे ठळक वैशिष्ट्ये होत. संतोष सुर्यवंशी व नाना वाघ यांनी सुत्रसंचलन करून श्री सुर्यवंशी यांनी आभार मानले.