शहर व ग्रामीणला जोडणाऱ्या खडकी रस्त्यांची दुरावस्था; दुपदरीकरण करण्याची मागणी
Poor condition of the Khadaki roads connecting the city and the countryside; Demand for decentralization
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon13 Feb23 , 18.20 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहर व नव्याने समाविष्ट झालेल्या कोपरगाव ग्रामीण भागाला एकत्रित जोडणाऱ्या खडकी रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक वाहनांचे छोटे-मोठे अपघात झाले असुन जीवित वा वित्त हानी टाळण्यासाठी रस्त्यांची कामे लवकरात लवकर पुर्ण करावीत, अशी मागणी खडकी भागातील माजी नगरसेविका ताराबाई जपे यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली आहे.
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शहरवासीय गेल्या अडिच ते तीन वर्षांपासून हैराण आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याची कामे सुरु करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराज स्मारक चौक ते टाकळी नाका ते गोदावरी पेट्रोल पंप हा रस्ता दुपदरी झालेला आहे त्याचे गोकुळ नगरी ते गोदावरी पंपापर्यंत डांबरीकरणाचे काम अपूर्ण आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नातून गोकुळनगरी येथील पुलाचे काम झाले आहे त्याचबरोबर कोपरगाव शहरालगत असलेल्या कोपरगाव ग्रामीण भागाचा शहर नगरपालिका हद्दीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळ नगरी, सह्याद्री नगर, ओम नगर, समतानगर, शिंदे शिंगी नगर, गवारे नगर, शंकरनगर, साई लक्ष्मी कुबेर नगर, लोढा मंगल केंद्र, भारत गॅस गोडावून आदि विस्तार मोठया प्रमाणांत वाढला असुन नव्या शहराची वाढ ह्याच बाजूला होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. दैनंदिन कामकाजासाठी दिवस रात्र ये जा सुरू असते. रस्त्याला खडडे पडल्यांने वाहनांचे व पायी चालणा-या पादचा-यांचे मोठे नुकसान होत आहे.. सध्याचा रस्ता अरूंद आहे. वाहनांची वर्दळ वाढल्यांने त्यातुन अपघातांचे प्रमाण वाढले आहे तेंव्हा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगांव यांनी सदर रस्त्याचे खड्डे बुजवून त्याचे दुपदरीकरणाचे काम तात्काळ हाती घ्यावे अन्यथा याविरुद्ध खडकीसह या रस्त्यावरील नवीन समाविष्ट झालेल्या नागरिकासह रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे .
Post Views:
244





