कोपरगावच्या २५ तलाठ्यांना मिळणार नवीन कार्यालय; साडेपाच कोटींची निविदा प्रसिद्ध – आ. आशुतोष काळे

कोपरगावच्या २५ तलाठ्यांना मिळणार नवीन कार्यालय; साडेपाच कोटींची निविदा प्रसिद्ध – आ. आशुतोष काळे

25 talathis of Kopargaon will get new office; Tender of five and a half crores released – A. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon13 Feb23 , 18.30 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :महाविकास आघाडी सरकारकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून तात्कालीन मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रलंबित असलेल्या जुने तलाठी कार्यालय नूतनीकरण व   तालुक्यातील २५ तलाठी कार्यालयांच्या नूतन इमारतीसाठी ५ कोटी ३३ लाख २० हजार रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणे, शेती बाबतचे दस्ताऐवज व नोंदी या तलाठी कार्यालयात असल्यामुळे तलाठी कार्यालयात नागरिकांची कामानिमित्त नेहमीच ये-जा असते. महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेक तलाठी कार्यालयांच्या इमारती जुनाट झाल्या होत्या. त्याच बरोबर काही तलाठी कार्यालयांना स्वत:च्या इमारती नव्हत्या.  त्यामुळे मिळेल त्या जागेत कारभार सुरु होता. याची आ. आशुतोष काळे यांनी दखल घेवून त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात तलाठी कार्यालयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. तेव्हापासून आ. आशुतोष काळे या तलाठी कार्यालयांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध होवून काम सुरु व्हावे यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून देर्डे कोऱ्हाळे, धोत्रे, काकडी, पोहेगाव, वारी, चास नळी, शिंगणापूर, संवत्सर,मंजूर, कोकमठाण, मढी बु., चादेकसारे, पढेगाव, ब्राम्हणगाव, धारणगाव, करंजी, येसगाव, तिळवणी, गोधेगाव, धामोरी, वेस, मळेगाव थडी, रांजणगाव देशमुख, जेऊर कुंभारी व कुंभारी या २५ गावातील तलाठी कार्यालयांचा समावेश आहे त्यासाठी ५ कोटी ३३ लाख२० हजार रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
 आ. आशुतोष काळे केलेल्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिकांना व महसूल कर्मचाऱ्यांना येत असलेल्या अडचणी सुटणार असल्याने तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.  

Leave a Reply

You cannot copy content of this page