संजीवनीच्या प्रा.डाॅ.माधुरी जावळे पुणे विद्यापीठाच्या  पुरस्काराने सन्मानित

संजीवनीच्या प्रा.डाॅ.माधुरी जावळे पुणे विद्यापीठाच्या  पुरस्काराने सन्मानित

                                                          Prof. Dr. Madhuri Javale of Sanjivani was honored with the award of Pune University

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue14 Feb23 , 16.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगांव: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील  माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डाॅ. माधुरी जावळे त्यांच्या अध्यापन आणि संशोधनातील नाविन्यपूर्ण पध्दती, नवोपक्रम, इत्यादी बाबींमधिल योगदानाची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना १० फेब्रुवारी रोजी कुलगुरू डाॅ. कारभारी काळे व उपकुलगुरू डाॅ. संजय सोनवणे यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट  नाविन्यपूर्ण शैक्षणिक  कामगिरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे  

   डाॅ. जावळे या  बेस्ट इनोव्हेटीव टिचर पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. यापुर्वीही त्यांना २०२० साली विद्यापीठाचा बेस्ट टिचर पुरस्कार प्राप्त झाला होता.
            डाॅ. जावळे या मागील २२ वर्षांपासून शिक्षण  क्षेत्रात कार्यरत असुन त्यांच्या विभागाला एआयसीटीई, नवी दिल्लीचे तीन वेळा एनबीए मानांकान प्राप्त झाले आहे. तसेच त्यांना विद्यापीठाकडून पी. एचडी गाईडची मान्यताही प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांकडून  समाज उपयोगी प्रोजेक्टस तयार करून घेणे, विध्यार्थ्यांना  प्रोजेक्ट आधारीत ज्ञान देणे, शिक्षणात  आधुनिक पध्दतींचा अवलंब करणे, इत्यादी बाबींची दखल विद्यापीठाकडून  घेण्यात आली. तसेच एआयसीटीई कडून विविध उपक्रमांसाठी निधी मिळविणे व त्याचा उपयोग प्रशिक्षणासाठी करणे. या अंतर्गत डाॅ. जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली  ब्लाॅक चैन अँड सायबर सिक्युरीटी या विषयावर देशातील ९०० पेक्षा अधिक प्राद्यापकांना प्रशिक्षण  देण्यात आले. तसेच रोल ऑफ  आयसीटी इन टिचिंग लर्निंग या विषयावरही ३००  पेक्षा अधिक प्राद्यापकांना प्रशिक्षित  करण्यात आले. तसेच त्यांनी स्कोपस इंडेक्स असलेल्या जर्नल्स मधुन आत्तापर्यंत २२ शोध  निबंध सादर केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल  सा. फु. पुणे विद्यापीठाने त्यांना बेस्ट इनोव्हेटीव टिचर पुरस्काराने सन्मानित केले.
डाॅ. जावळे यांच्या यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी त्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी धोरणात्मक संचालक (स्ट्रॅटेजिक डायरेक्टर) डाॅ. शांतम शुक्ला व संचालक डाॅ. ए. जी. ठाकुर उपस्थित होते. डाॅ. जावळे यांच्या या उपलब्धीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व विश्वस्त  अमित कोल्हे यांनीही त्यांचे अभिनंदन केले.
चौकट
सुमारे ३५०  पेक्षा अधिक संस्थांमधुन डाॅ. माधुरी जावळे यांची ‘उत्कृष्ट  नाविन्यपूर्ण शैक्षणिक  कामगिरी’ पुरस्कारासाठी निवड होणे, ही बाब संजीवनीच्या प्राद्यापकांच्या उत्कृष्टतेची ची पावती आहे. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नाव पुन्हा एकदा उत्कृष्टतेच्या  यादीत अधोरेखित झाले आहे.- श्री अमित कोल्हे

Leave a Reply

You cannot copy content of this page