गुरु शुक्राचार्यांच्या संजीवनी विद्येचा महिमा विश्वभर – विवेक कोल्हे
Guru Shukracharya’s Sanjivani Vidy is glorified all over the world – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue14 Feb23 , 16.10 Pm By राजेंद्र सालकर:
कोपरगाव : कोपरगाव बेट येथील गुरु शुक्राचार्य यांचे जगातील एकमेव मंदिर असून इतिहासाची आठवण देणाऱ्या गुरु शुक्राचार्य यांच्या संजीवनी विद्येचा महिमा संपूर्ण विश्वभर असल्याचे गौरव उद्गार जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सोमवारी गुरू शुक्राचार्य महाराजांच्या दोन मूर्तींचे पूजन व स्थापना प्रसंगी व्यक्त केले
कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट संस्थेचे अध्यक्ष,पराग संधान यांचा मंदिर प्रशासनाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
दोन फूट उंच असलेल्या या गुरु शुक्राचार्यांच्या प्रसन्न मूर्ती भाळवणी येथील प्राध्यापक संजय काळे यांनी तयार केल्या आहेत.भाविकांसाठी खास अभिषेक कक्ष येथे स्थापन करण्यात आला असून एक मूर्ती गाभाऱ्यात तर एक अभिषेक लक्षात ठेवण्यात आली आहे. पूजन व मध्यान आरती होऊन महाप्रसाद वाटण्यात आला.
युवक नेते विवेक कोल्हे यांनी मंदिरासाठी कोणतीही मदत लागली तर ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे असे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितले. गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या पवित्र मूर्तीचे पूजन ब्रह्म वृंदांच्या मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता तर पराग संधान यांचे हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले .
कोपरगाव बेट भागात गुरु शुक्राचार्य प्रतिमेची सनई चौघडाच्या निनादात शंख ध्वनी, ढोल ताशाच्या गजरात, फुले पाकळ्यांची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. या ऐतिहासिक उपक्रमाचे परिसरातील नागरिक, महिला, शेकडो भक्त साक्षीदार झाले होते, सर्वांनी मिरवणुकीत सहभाग देत धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला.