कोपरगाव : आत्मा मलिक हॉस्पिटल मधील मेडिकलच्या नफ्याचे  आमिष दाखवून १.७७ कोटींची फसवणूक

कोपरगाव : आत्मा मलिक हॉस्पिटल मधील मेडिकलच्या नफ्याचे  आमिष दाखवून १.७७ कोटींची फसवणूक

Kopargaon: Fraud of 1.77 crores in Atma Malik Hospital by luring medical profit

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir17 Feb23 , 17.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : आत्मा मालिक हॉस्पीटल कोकमठाण येथील मेडीकल चालविण्यासाठी देण्याचे कारण करून त्याद्वारे येणा-या नफ्याचे आमिष दाखवुन सदर मेडीकल चालविण्याचे बदल्यात डिपॉझिटचे कारण पुढे करून डॉ. सुमन सुकुमार बंडोपाध्याय व संजय नंदु कोळी या दोघांवर १ कोटी ७७ लाखांचीआर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने  मोठी खळबळ माजली आहे.

डॉ. सुमन सुकुमार बंडोपाध्याय रा. दामीनी सोसायटी पोतदार वर्ड कॉलेज मागे जुहुतारा रोड मुंबई – ४०००४९.व संजय नंदु कोळी रा. शंकर अपार्टमेंट बारामती पुणे, यांनी फसवणूक केल्याबद्दल  येथील निलेश रविंद्र चौधरी, रा. शिंगवे ता. राहाता जि. अहमदनगर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ३० जुलै २ ऑगस्ट  ३० ऑगस्ट २१  पासून वारंवार आरोपी यांनी संगनमत करुन आत्मा मालिक हॉस्पीटल कोकमठाण ता कोपरगाव येथील मेडीकल चालविण्यासाठी देण्याचे कारण करून त्याद्वारे येणा-या नफ्याचे आमिष दाखवुन सदर मेडीकल चालविण्याचे बदल्यात डिपॉझिटचे कारण पुढे करून फिर्यादी व साक्षीदार यासर्वांकडुन एकुण १ कोटी ७७ लाख ६५ हजार ८६२  रूपये बैंक द्वारे वेळोवेळी घेवून डॉ. सुमन सुकुमार बंडोपाध्याय व संजय नंदु कोळी यांनी चौधरी यांचा विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे. पोलीस शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page