विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या रस्त्यांचे जाळे विस्तारणार – आ. आशुतोष काळे
The road network which plays an important role in development will be expanded. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu23 Feb23 ,17.30 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: गाव शहर व तालुका असो विकासामध्ये दळणवळणाइतकी महत्त्वाची भूमिका अन्य कोणत्याही घटकाची असत नाही त्यासाठी विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या रस्त्यांचे जाळे विस्तारणार असल्याचा मनोदय आ.आशुतोष काळे यांनी कोकमठाण येथील एका कार्यक्रमात व्यक्त केला. अध्यक्षस्थानी दिलीप अजमेरे होते.
दर्जेदार रस्ते असणे अत्यंत आवश्यक असून त्याशिवाय विकास साधने शक्य नाही. रस्त्यांची सुविधा असल्यास दळणवळणाच्या अडचणी येत नाही. शेतकरी, दुध व्यवसायिक यांचे साधने वाडी वस्तीपासून गाव व शहरापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे वाडी वस्तीपासून गावा पर्यंत व गावापासून शहरापर्यंत रस्ते असल्यास बाजारपेठेला चालना मिळण्यास मदत होते व गावचा, शहराचा विकास होवू शकतो. विस्तीर्ण परिसर असलेल्या कोकमठाणमध्ये देखील रस्त्यांचे जाळे निर्माण होणे हि काळाची गरज आहे.
कोकमठाण येथे १० लाखाचे बहुउद्देशीय सभागृह बांधणे (गो-शाळा) मंजूर घरकुल चाळीस लाखाच्या कोकमठाण-माळवाडीरस्ता डांबरीकरण क्रीडा वाटप प्रसन्न वाटप कार्यक्रम करण्यात आले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोकमठाणच्या ग्रामस्थांनी विकासाच्या बाबतीत मांडलेले प्रश्न मागील तीन वर्षात मार्गी लावले आहेत. यापुढील काळात देखील कोकमठाण व परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. हे सांगताना त्यांनी. कोकमठाणला अल्पसंख्यांक निधीतून आजपर्यंत २० लक्ष रुपये निधी, स्मशानभूमीत संरक्षक कम्पाउंडचे काम प्रगतीपथावर आहे. बांधवांच्या समाज मंदिरासाठी प्रत्येकी १० लाख, श्री लक्ष्मी माता मंदिरास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिला आहे. या देवस्थानच्या विकासासाठी ५० लाख, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील २० लक्ष रुपये निधी दिला असल्याचा पाढा वाचला .
यावेळी कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, सुधाकर रोहोम, सुरेश जाधव, दिलीप अजमेरे, कैलास ठोळे, अतुल काले, मंदार पहाडे, सरपंच सौ. उषाताई दुशिंग, उपसरपंच अरविंद रक्ताटे, सुदाम लोंढे, विजय रक्ताटे, विजयराव पंढरीनाथ रक्ताटे, विजय थोरात, दादासाहेब साबळे, प्रकाश देशमुख, सुनील कुहिले, शंकर वाघ, सोपान काशीद, गोरक्षनाथ लोहकणे, प्रभाकर धिवर, जॉनी धिवर, दिपक रोहोम, श्याम लोहकणे, दत्तात्रय टिळेकर, प्रविण पाटणी, आनंद दगडे, आनंद पहाडे, अमित जैन, शैलेश ठोळे, अमोल काले, दिनकर रोहोम, अजित रक्ताटे संदीप लोहकणे, अनंत रक्ताटे, विशाल जाधव, सोमाजी महाजन, ज्ञानेश्वर रक्ताटे, संतोष लोंढे, संजय थोरात, सुभाष लोंढे, विशाल शितोळे, आप्पासाहेब लोहकणे, मच्छिन्द्र देशमुख, बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब फटांगरे, दिलावर सय्यद, सदाशिव रक्ताटे, शरद फटांगरे, अल्लाउद्दीन सय्यद, अविनाश निकम, पंकज लोंढे, किरण धिवर, शाहबाज सय्यद, संभाजी देशमुख, दिपक कराळे, श्रीकांत गायकवाड, सलीम सय्यद, अखिलेश भाकरे, प्रभाकर भाकरे, पंचायत समिती बांधकाम विभागाचे चांगदेव लाटे, गणेश गुंजाळ, ग्रामसेवक संग्राम बोर्डे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.