शिवसैनिक म्हणून नाहीतर शिवसेवक म्हणून काम करणार -प्रमोद लबडे 

शिवसैनिक म्हणून नाहीतर शिवसेवक म्हणून काम करणार -प्रमोद लबडे 

Will work as Shiv Sainik or Shiv Sevak – Pramod Labde

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu23 Feb23 ,17.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव मतदार संघातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष गटतट सोडून तळागाळातील सर्वच घटकांना बरोबर घेऊन काम करणार पक्षाची बिकट परिस्थिती असताना आम्हाला काम करण्याची संधी मिळाली या संधीचे नक्कीच सोने करतांना शिवसैनिक म्हणुन नाही तर शिवसेवक म्हणून काम करणार असा दृढ विश्वास नवीन जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी व्यक्त केला. 

नियुक्ती जाहीर झाल्यानंतर पदभार स्वीकारण्यापूर्वी ढोल ताशाच्या मिरवणुकीने जाऊन छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना अभिवादन करून आशीर्वाद घेतला.यावेळी शिवसैनिकांनी मोठी फटाक्यांची आतिषबाजी जल्लोष करत  जोरदार घोषणाबाजी केली.   
यावेळी शहर प्रमुख सनी वाघ म्हणाले,  संकट समयी पक्षाने आमच्यावर विश्वास टाकून  मोठी जबाबदारी टाकली आहे  त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. शिवसेनेचे ब्रीद वाक्य ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण घेऊन पुढे चालणार घर तिथे शिवसैनिक गाव तिथे शाखा हा उपक्रम राबविणार  असल्याचा मनोदय व्यक्त केला.
 तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे म्हणाले अटलबिहारी वाजपेयी- आडवाणीची, महाजन -मुंडेंची, वहाडणे फरांदे यांची ही भाजप राहिलेली नाही शिवसेनेप्रमुखांचा हात धरून महाराष्ट्रात फोफावलेल्या भाजपने आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्यावर अन्याय चालवलेला आहे त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी जनता संधीची वाट पाहत आहे निवडणूक आयोगाने घेतलेल्या घाईघाईचा निर्णय हा निवडणूक आयोग मृत झाल्याचे लक्षण आहे मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाचे पाताळयंत्री कारस्थान असल्याचा घणाघाती आरोप केला.  कोपरगाव  मतदारसंघात शिवसेनेने सातत्याने नगरपालिका, विधानसभा व लोकसभा आपला  भगवा  झेंडा फडकविला आहे पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करणारच असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
विधानसभा संघटक असलम शेख म्हणाले  पक्षाने टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता पुन्हा एकदा जुन्या नव्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन पक्ष बांधणी करणार, शिवसेनेला जे सोन्याचे दिवस होते ते पुन्हा आणण्याची सुरुवात कोपरगावातून करू यासाठी पुन्हा एकदा शहरातील ३१ नव्या जुन्या  शिवसेना शाखा पुर्णर्जीवीत करणार, कोणतंही पद कायमस्वरूपी राहत नाही पदं येतात जातात नाराज होऊ नका, गट तट सोडून ज्येष्ठांना त्यांचा मान देणार, आजी माजी यांना बरोबर घेऊन काम करणार त्यांनीही आम्हाला सांभाळून घ्यावे,  विधानसभा संघटक या नात्याने भविष्यात येणारी  प्रत्येक निवडणूक शिवसेना ताकदीने लढणार  असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले 
प्रास्ताविक करताना माजी शहरप्रमुख भरत मोरे म्हणाले, संविधान पायदळी तुडवून शिवसेना संपविण्याचा घाट घातला जात आहे. कितीही दडपशाही आणली तरी महाराष्ट्रातील मराठी माणसाला शिवसेना हाच एकमेव पर्याय आहे शिवसैनिक व  नागरीकांसाठी शहरसंपर्क व जिल्हा संपर्क कार्यालयाचे दार २४ तास  खुले आहे. मरगळ झटकून कामाला लागू या पुन्हा महाराष्ट्र जिंकूया असा नारा देत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत सत्कार  केले. संधी दिल्याबद्दल शिवसेना सचिव खा.अनिल देसाई, शिवसेना सचिव खा.विनायक राऊत, नगर जिल्हा समन्वयक विश्वनाथ नेरूळकर,जिल्हा संपर्क नेते बबनराव घोलप,या शिवसेना पदाधिका-यांचे व पक्षाचे आभार व्यक्त केले.
यावेळीउपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,
कालुअप्पा आव्हाड, मनोज कपोते, शिवनारायण परदेशी,भुषण पाटणकर, गगन हाडा,रवि कथले, बालाजी गोर्डे, मुन्नाभाई मन्सुरी, सागर फडे योगेश मोरे,सिध्दार्थ शेळके, नितिश बोरूडे, आतिष बोरूडे, मयुर खरनार, राजुभाई शेख,वाल्मिक चिने,सोनु पाठक, आकाश कानडे, अमित भास्कर, राहुल साटोटे,मुन्ना पटेल,कृष्णा आहेर, चंद्रकांत भिंगारे,  किरण संवत्सरकर, अतुल संवत्सरकर, रफिक शेख, मुन्ना पटेल, विजू भोकरे,राहुल कवरे, बाबा कुंढारे, वसीम पटेल, राजू हरणे, दीपक पाठक  सचिन वाघ ,सचिन नजन, दशरथ राऊत, आनंदा रुकारे, संतोष जाधव, आशिष निकुंभ, अभिषेक सारंगधर, मयूर फुकटे, माधव आहेर, सोमनाथ लोहकरे, सोनू यादव, नितीन चव्हाण  सागर परदेशी, गौतम हाडा, चेतन निंदाने, साईल पाटवेकर, शुभम राखपसरे, गौतम निंदाने, राहुल हाडा, स्वप्निल निरभवणे, चेतन सुरासे, सुनील देवकर अनिल फोपसे निसार शेख आदीसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page