१९ कोटी निधीतुन सुरेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला – आ. आशुतोष काळे

१९ कोटी निधीतुन सुरेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला – आ. आशुतोष काळे

Suregaon water problem solved permanently with 19 crores fund – A. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat25 Feb23 ,17.40 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव: कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोक काळे यांनी नेहमीच सुरेगावच्या विकासाचे प्रश्न सोडवून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. १९ कोटी रुपये निधी देवून सुरेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी शिवाजीराव वाबळे होते. तर अतिथी म्हणून हवामान तज्ञ पंजाबराव डख उपस्थित होते.

सुरेगाव ग्रामपंचायतीच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित  आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सुरेगावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात तसेच चित्रकला, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली    

आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, सुरेगावच्या आजी-माजी  ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या योगदानातून   गावाच्या विकासाला हातभार लागला आहे  सुरेगाव ग्रामपंचायत विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात अव्वल क्रमांकावर जाईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित नागरिकांना हवामानाचा गोषवारा मांडताना हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी  मागील वर्षीप्रमाणेच २०२३ ला देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याची गोड बातमी दिली. पंजाबराव डख यांचे हवामानाचे अंदाज तंतोतंत खरे ठरत असल्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.  हवामानाबाबत सखोल विश्लेषण करतांना त्यांनी   फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडी राहणार असून मार्च महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढणार असून हवामान कोरडे राहणार आहे मात्र ५ मार्च नंतर राज्यात पुन्हा हवामान खराब होणार आहे. ५ तारखेनंतर विदर्भ व पूर्व विदर्भात पाऊस पडण्याचा अंदाज असून त्याची काही अंशी झळ बसण्याची शक्यता असून काढणीला आलेला गहू, हरबरा लवकरात लवकर काढून घ्या असा सल्ला दिला व यावर्षी दिवाळीमध्ये देखील पाऊस राहणार असल्याचा अंदाज सांगितला आहे.

सुहासराव वाबळे म्हणाले आमदार आशुतोष काळे यांनी अल्पावधीत विकासाची गरुडझेप घेवून रस्ते विकासाचा मोठा अनुशेष भरून काढला. जनता नेहमी त्यांच्या पाठीमागे राहील. अशी ग्वाही दिली

 

चौकट 

एल-निनो व ला-निनो हे स्पॅनिष भाषेतील शब्द आहेत.एल-निनो चक्रीवादळ तयार झाल्यास दुष्काळ पडतो व ला-निनो चक्रीवादळ तयार झाल्यास मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्याच बरोबर मुंबईकडून जर पाऊस आला तर त्यावर्षी नगर जिल्ह्यात पाऊस कमी होतो व जर हाच पाऊस पूर्वेकडून आला तर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पाऊस होतो. त्यामुळे नगरजिल्ह्यातील सर्वांनी वरून राजाला पूर्वेकडून येण्यासाठी प्रार्थना करावी- हवामान तज्ञ पंजाबराव डख 

यावेळी  अतुल दवंगे, वाल्मिकराव कोळपे,  राजेंद्र मेहेरखांब,  राजेंद्र ढोमसे, सुदामराव वाबळे, बन्सी निकम, ज्ञानेश्वर हाळनोर,  सिकंदर पटेल, दगु गोरे, मोहनराव वाबळे, पंढरीनाथ जाधव, उद्योजक रणजित वाबळे, पांडुरंग ढोमसे, नामदेव कोळपे, भाऊसाहेब कदम, राजेंद्र निकम, जगनराव गोरे, नवनाथ गोरे, कैलास कदम, सुहासराव वाबळे, पं.स. विस्तार अधिकारी तोरणे, रविंद्र देवकर, अंबादास धनगर,  सरपंच सचिन वाबळे,  सरपंच प्रविण निंबाळकर, राहुल जगधने,  सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर, तसेच सर्व सदस्य आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

Leave a Reply

You cannot copy content of this page