कासली ग्रामस्थांचे रस्त्याचे प्रश्न मार्गी लागले  – आ. आशुतोष काळे

कासली ग्रामस्थांचे रस्त्याचे प्रश्न मार्गी लागले  – आ. आशुतोष काळे

Road issues of Kasli villagers got resolved – Aa. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat25 Feb23 ,17.50 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील रा.मा. ६५ (कासली फाटा) ते कासली गाव व कासली ते दहेगाव बोलका रस्ता (ग्रा.मा. ७६)  निधीतून एक रस्ता पूर्ण झाला असून दुसऱ्या रस्त्याच्या कामास प्रारंभ होत आहे. या दोनही रस्त्यांचे काम मार्गी लागल्यामुळे कासली ग्रामस्थांच्या बहुतांश समस्या मार्गी लागल्या असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी कासली येथे सांगितले.

ते म्हणाले की, कासली ग्रामस्थांना दहेगाव बोलका गावाशी नियमित ये-जा असते. आठवडे बाजार, वैद्यकीय उपचार घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केद्र, राष्ट्रीयकृत बँक दहेगावला असल्यामुळे कासली ग्रामस्थांना या खराब रस्त्याचा मोठा त्रास होत होता.मात्र या अडचणी आता दूर होणार असून रस्त्याच्या समस्या मार्गी लागल्यामुळे दहेगाव बोलका गावच्या बाजारपेठेत देखील आर्थिक उलाढाल वाढणार आहे. त्यामुळे या दोनही रस्त्यांमुळे दुहेरी फायदा होणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले व उर्वरित रस्त्यासाठी देखील निधी देवू अशी ग्वाही दिली.  
यावेळी कारभारी आगवन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक श्रावण  आसने, सरपंच बाळासाहेब आहेर, करंजीचे उपसरपंच शिवाजी जाधव, सांडूभाई पठाण, नानासाहेब निकम, आप्पासाहेब निकम, सुनील मलिक, चंद्रशेखर म्हस्के, देवराम घेगडमल, चांगदेव मलिक, विष्णु सुंबे, सुरेश मलिक, प्रभाकर मलिक, भानुदास मांडवडे, बाळासाहेब कापसे, रावसाहेब मलिक, डॉ. कृष्णा मलिक, सुहास मलिक, माजी उपसरपंच दत्तात्रय मलिक, गंगाधर साळुंके, दिनेश जमधडे, सुनीलजी कुहिले, भाऊसाहेब मलिक, किरण मलिक, प्रकाश मलिक, नानासाहेब मलिक, दीपक भगुरे, गणपत मलिक, अखिलेश भाकरे, देवराम पवार, प्रमोद आहेर, आनंद सुंबे, अंबादास मांडवडे, संजय भगुरे, तुकाराम भगुरे, भाऊसाहेब मांडवडे, नवनाथ मलिक, हिरामण गुंजाळ, बाबासाहेब भगुरे, वसंत घोगरे, विजय कदम, चंद्रभान सुंबे, रामभाऊ भाकरे, जगन्नाथ बागल, गुलाबराव देशमुख, माणिकराव देशमुख, अशोक आभाळे, पोपट काकडे, बाळासाहेब देशमुख, शिवाजी बागल, मच्छिन्द्र बागल, बाळासाहेब शिंदे, गोकुळ निघोट, गहिनीनाथ निघोट, दिपक देशमुख, रामेश्वर देशमुख, साहेबराव देशमुख, देवराम पवार, मंगेश देशमुख, सुभाष देशमुख, रावसाहेब अभंग, पुंडलीक वाकचौरे, राजेंद्र काकडे, सुरेश जोशी, गोरखकाळे, किशोर देशमुख, भाऊराव वलटे, सुनील धोत्रे, विठ्ठल वाकचौरे, कल्याण देशमुख, प्रभाकर आबक, रामेश्वर देशमुख, सुभाष देशमुख, अखिलेश भाकरे, बाळासाहेब आहेर, राजेंद्र नवले, बाबासाहेब साळुंके, तुकाराम भगूरे, रामभाऊ मलिक, रामभाऊ भाकरे, भाऊराव हेगडमल, संजय उगले, लक्ष्मण भिंगारे, ग्रामसेवक सुधाकर पगारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दिलीप गाडे, रविंद्र चौधरी, पंचायत समिती शाखा अभियंता गणेश गुंजाळ, कॉन्ट्रॅक्टर वैभव घुले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
      

Leave a Reply

You cannot copy content of this page