हा सन्मान सर्व महिलांचा सन्मान – सौ.चैताली काळे
This honor Honor of all women – Mrs. Chaitali Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon13 March23 ,19.20 PmBy राजेंद्र सालकर
कोपरगाव : समाजकार्याची प्रेरणा मला मतदार संघातील महिला कडून मिळाल्याने माझा सन्मान खऱ्या अर्थाने हा सर्व महिलांचा असल्याचे गौरव उद्गार जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी एका महिला सन्मान सोहळ्यात केले
महिला दिनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, राजयोग अध्यात्मिक मेडिटेशन ध्यान केंद्र साईनगर यांनी चैताली काळे यांचा महिला सबलीकरणातील अविरत योगदानाबद्दल केलेल्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.
चैताली काळे पुढे म्हणाल्या गृहिणी, उद्योजक, धार्मिक, शासकीय सेवा असो की, बचत गटाची महिला यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांकडून मला प्रेरणा व ऊर्जा मिळते.
राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दीदी यांनी अध्यात्मिक मेडिटेशन ध्यान केंद्राच्या माध्यमातून कोपरगावसह नासिक विभागात मोठे काम केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.
याप्रसंगी राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दीदी, माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे, सौ. सुधा ठोळे, सौ. स्वाती कोयटे, सौ.सिमरन खुबाणी, सौ.शीतल वाबळे, सौ.रश्मी जोशी, सौ.मनजीतकौर पोथीवाल, सौ.रेखा उंडे, सौ.अनुपमा बोर्डे, सौ.लता भामरे, सौ.संजीवनी शिंदे, श्रीमती मंगल वल्टे, सौ.पुजा शर्मा, सौ.रत्ना पाटील, विरन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, श्रीमती वर्षा गंगूले, सौ. माधवी वाकचौरे, सौ.गौरी पहाडे, बेबीआपा पठाण, सौ.रश्मी कडू, सौ.सुषमा पांडे, सौ.रुपाली कळसकर, सौ.शितल वायखिंडे, सौ.भाग्यश्री बोरुडे, सौ.नंदा लासुरे, सौ.छाया फरताळे आदी मान्यवर उपस्थित होते.