हा सन्मान समता परिवारातील महिलांचा – सौ. स्वाती कोयटे
This honor belongs to the women of the Samata family – Mrs. Swati Sandeep Koyte
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon13 March23 ,19.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव – समता परिवाराच्या माध्यमातून कोयटे परिवाराने सहकार, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे मिळालेला सन्मान हा समता परिवारातील महिलांचा असल्याचे गौरव उद्गार सौ.स्वाती कोयटे यांनी महिला दिनी राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सरला दिदी यांचे हस्ते ब्रम्हाकुमारीज नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले.
यावेळी सरला दिदी म्हणाल्या की, प्रत्येक क्षेत्रातील महिलांच्या योगदानाबद्दल त्यांना आम्ही त्यांचा सन्मान करतो यामुळे त्यांना त्या पदांवर काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि आत्मविश्वास ही वाढीस लागतो.
या सन्मान सोहळ्यास माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे, जिल्हा बॅंकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे, सौ.सुधाभाभी ठोळे, शितल वाबळे, रश्मी जोशी, आधीच विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या