संजीवनीच्या चार विद्यार्थ्यांना परदेशात  एमएस साठी शंभर टक्के  शिष्यवृत्ती  –  अमित कोल्हे

संजीवनीच्या चार विद्यार्थ्यांना परदेशात  एमएस साठी शंभर टक्के  शिष्यवृत्ती  –  अमित कोल्हे
Hundred percent scholarship for MS abroad to four students of Sanjeevi – Amit Kolhe

  संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाची उपलब्धीAchievements of Sanjeevani International Relations Department

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon13 March23 ,19.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगांव: संजीवनी इंटरनॅशनल रिलेशनशिप विभागाच्या माध्यमातून संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची कॅनडा व अमेरिका विद्यापीठात एम एस साठी निवड झाली असून त्यांना  शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे अशी माहिती  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्ट अमित कोल्हे यांनी दिली आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा संजीवनीने आपले स्थान अधोरेखित केले आहे असे गौरवउद्गार व्यक्त केले 

श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की 
परदेशात  एमएस  करण्यासाठी संजीवनी मधून मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर विद्यापीठाच्या सर्व कसोट्या पूर्ण करून  भारतातील आयआयटी, एनआयटी, अशा  संस्थांमधिल विध्यार्थ्यांची  बरोबरी साधली आहे. ग्रामिण भागातील सर्व सामान्य कुटूंबातील मुलं १०० टक्के शिष्यवृत्तीच्या  खर्चातुन परदेशात शिकायला जाणार, ही बाब संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे.
 अंतिम वर्षाच्या ओंकार कैलास राहणे याची इलिनाॅईस इन्स्टिट्यूट ऑफ  टेक्नाॅलाॅजी सिकागो, नाॅर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी  बोस्टन, दि युनिव्हर्सिटी ऑफ  टेक्सास व सिरॅकाॅज युनिव्हर्सिटी  न्युयाॅर्क मध्ये एम.एस. साठी निवड झाली आहे. चैतन्य संतोष  टेकणे याची युनिव्हर्सिटी ऑफ  माॅन्टरिअल, वैष्णवी विनोद नाईकवाडे हिची व संकेत सुरेश  इंगळे याची काॅन्काॅर्डिया युनिव्हर्सिटी  कॅनडा मध्ये एमएस साठी निवड झाली आहे.  अंतिम निकालानंतर ते एमएस करण्यासाठी परदेशी  रवाना होणार आहे.
 या विध्यार्थ्यांना  महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे प्रमुख डाॅ. महेंद्र गवळी यांचे मार्गदर्शन  लाभले.    
सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे  व त्यांच्या पालकांचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page