पश्चिमे पश्चिमेचे पाणी  पूर्वेला वळवा; आ. काळे  यांच शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे.-  रोहोम

पश्चिमे पश्चिमेचे पाणी  पूर्वेला वळवा; आ. काळे  यांच शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे.-  रोहोम

turn the waters of the west to the east; come Kale’s peasant love is basically fake.- Rohome

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 16 March23 ,19.40 Pm By राजेंद्र सालकर

 कोपरगाव : समन्यायी पाणी वाटप कायदा असो की आमच्या दारणा धरणातून हक्काचे पाणी येवला मतदार संघातील चाळीसगावांना दिले   या दोन्ही वेळेस मौन बाळगणाऱ्या काळे पिता-पुत्रांने   आमचे हक्काचे पाणी घालवले आणि आता पश्चिमे पश्चिमेचे पाणी  पूर्वेला वळवा;  अशी मागणी करणा-या आ. काळे यांना  गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांवर आज अन्याय होत असल्याचा साक्षात्कार झाला  काय ? मुळात  यांच शेतकरी प्रेमच  नकली आहे.  अशी घणाघाती टीका  भाजपा  तालुका अध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी एका पत्रकाद्वारे केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने २००५ साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला, तेंव्हा  विरोधी आमदार असतानाही आमदार  अशोक काळे यांनी विरोध न करता मौन पाळले. यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने येवला मतदार संघातील चाळीस गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी २.६८ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण मंजूर झाले.आमच्या हक्काच्या पाण्यातून पाणी गेले.  तेव्हा सत्तेत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे  विद्यमान आमदार   आशुतोष काळे यांनी  विरोध न करता दोन अडीच वर्ष मौन  पाळले,तालुक्याला पिण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी मिळणारे पाणी कमी झाले आहे. ओव्हर फ्लोचे पाणीदेखील शेतकऱ्यांना मिळत नाही. या पाण्याच्या तुटीमुळे कोपरगाव तालुक्यातील व गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी देशोधडीला लागले आहेत.  आता  भाजप सेनेचे सरकार सत्तेवर आल्यावर पूर्वेचे पाणी पश्चिमेला वाळवा  ही आमदार आशुतोष काळे यांची मागणी  म्हणजे  निष्क्रियता लपवण्यासाठीशेतकऱ्यांचा आपल्याला  कळवळा असल्याचा  निव्वळ देखावा  असल्याची टीका रोहोम यांनी केली.   
कोपरगाव शहरासाठी निळवंडे चे पाणी येत असताना  त्या पाण्यालाही  कोर्टात  अडून विरोध  करण्याचे पाप कोणी केले हे  लपून राहिलेले नाही ते तालुक्यासह शहरातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. कोपरगाव मतदार संघातील पाण्यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी स्वपक्षाशी  रस्त्यावर उतरण्याचे धाडस दाखविले, शहराच्या पाण्यासाठी तलावाची जागा मिळवून दिली बिपिन कोल्हे यांनी ४९ कोटीची पाणी योजना मंजूर करून आणली. चार नंबर साठवण तलावाचे काम  सुरू करण्यासाठी तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मोठे प्रयत्न केले परंतु काही लोकांच्या हटवादीपणामुळे ते काम अपूर्ण राहिले.  तात्कालीन  आमदार स्नेहलता कोल्हे यांनी  युती सरकारच्या काळात आपले वजन खर्च करून निळवंडे चे पाणी फुकटात थेट कोपरगावात आणण्याचे  ऐतिहासिक काम करण्याचे धाडस दाखविले काम फत्तेही केले परंतु काही झारीतील शुक्राचार्य आडवे आले म्हणून  कोपरगावकरांच्या तोंडचे पाणी गेले. या मागचा करता करविता कोण हे कोपरगावकरांना चांगलेच ज्ञात आहे  कोपरगाव शहर असो की तालुक्याचे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे कुटुंबीयांचे  मोठे योगदान आहे  याउलट काळे कुटुंबीयांनी  हक्काचे असलेले आणि मिळणारे पाणी घालवण्याचेच काम केले असा आरोप करून आ. काळे हे प्रसिद्धीसाठी रोज नव्याने जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका साहेबराव रोहोम यांनी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page