को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी विवेक कोल्हे यांची निवड
Election of Vivek Kolhe as Director of Co-Generation Association of India
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 16 March23 ,20.00 PmBy राजेंद्र सालकर
कोपरगांव : को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदासाठी राज्यस्तरावर झालेल्या निवडणुकीत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांची सर्वानुमते निवड झाली आहे त्याबददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उसाच्या चिपाडापासून वीज निर्मीतीचे प्रकल्प हाती घेऊन सहकारमहर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत १२ मे वॅट सहवीज निर्मीतीचा प्रकल्प सुरू केला त्यात येणा-या अडी अडचणी सोडविण्यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून विविध सुधारणा घडवून आणल्या होत्या.
विवेक कोल्हे म्हणाले की, येणारा काळ हा स्पर्धेचा आहे. त्यात सहकारी साखर कारखाने, त्यांचे विविध उपपदार्थ तसेच औषधी प्रकल्प त्याचबरोबर सहवीज निर्मीती प्रकल्पासाठी असोसिएशनच्या माध्यमांतून केंद्र व राज्यस्तरावर काम करू. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याची प्रेरणा, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहु असेही ते शेवटी म्हणाले.
Post Views:
147