केंद्र सरकारने  इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देऊन साखर निर्यातीवर बंदी आणावी ;  बिपिन कोल्हे

केंद्र सरकारने  इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देऊन साखर निर्यातीवर बंदी आणावी ;  बिपिन कोल्हे

The central government should encourage ethanol production and ban sugar exports; Bipin Kohle

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 27 March24 ,15.30 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : केंद्रातील मोदी सरकारने  इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देऊन देशात गरजेचे पुरतीच साखर करावी, व साखर  निर्यातीवर बंदी आणावी अशी जोरदार मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी सोमवारी (२७) रोजी  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या ६० व्या गळीत हंगामाच्या सांगता प्रसंगी केली. साखर निर्यात बंद करा, असे  सांगणारा राज्यातील मी पहिलाच चेअरमन  असावा असेही ते म्हणाले,  अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे होते.

साठाव्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी संचालिका सौ. सोनिया व बाळासाहेब दत्तात्रय पानगव्हाणे या उभयतांच्या हस्ते विधीवत पुजेने झाली.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा वारसा आणि वसा घेवुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने दैनंदिन गाळप क्षमतेत आधुनिकीकरणासह संगणकीकरणाला प्राधान्य देत सुधारणा करून मार्गक्रमण सुरू ठेवले असून  आर्थिक शिस्त व गतीमान प्रशासकीय कामकाज, प्रशासकीय शिस्त, विना अपघात कारखाना कामकाज, उस उत्पादक शेतक-यांसह कामगारांचे हित, सर्व संगणकीकरण कामकाज या पंचसुत्रीची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याचे ते म्हणाले.
             
उपाध्यक्ष रमेश घोडेराव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, एच आर मॅनेजर प्रदिप गुरव, सचिव विधिज्ञ तुळशीराम कानवडे आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.
बिपिन कोल्हे म्हणाले जागतिक बाजारपेठेत ब्राझीलच्या साखरेला मोठी मागणी असते भारतापेक्षा अधिक आयात ब्राझील करतो. 
ब्राझील जागतिक बाजारपेठेचा अंदाज घेऊन  साखर करायची की इथेनॉल करायचं याचा निर्णय घेते. आपल्याकडे देशात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर निर्यातीचे धोरण सरकार ठरवते, ब्राझीलच्या साखरेच्या तुलनेत आपल्याला साखरेचा भाव कमी मिळतो. त्यामुळे पाहिजे तितके परकीय चलन साखर निर्यातीतून मिळत नाही. याउलट पेट्रोल आणि क्रूड ऑइल साठी मोठ्या प्रमाणात भारताला परकीय चलन द्यावे लागते तेंव्हा  देशात  गरजेपुरते साखरेचे उत्पादन करावे, केंद्र सरकारने इथेनॉल साठी प्रोत्साहन अनुदान वाढवावे, इथेनॉल निर्मितीवर भर दिल्यास   पेट्रोल आणि क्रूड ऑइल साठी द्यावे लागणारे परकीय चलन मोठ्या प्रमाणात वाचेल परिणामतः देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रणात राहतील व साखर व्यवसायालाही स्थिरता लाभेल. 
बिपिन कोल्हे पुढे म्हणाले, उसाचा भाव टनावर नाही तर ऊस उताऱ्यावर ठरतो त्यामुळे  ऊस शेती किफायतशीर व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी एकरी उसाचे उत्पन्न वाढवले पाहिजे कारखाना आधुनिकतेकडे जात आहे शेतकऱ्यांनी मात्र बदलण्यास तयार नाही त्यानेही  आधुनिकतेकडे जायला पाहिजे आपल्याकडे उसाच्या सहा हजार जाती आहेत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कमी पाण्यात दर्जेदार बेण्यांत उसाचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला तोच आदर्श ठेवून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या उस बेणे मळ्यात ६ हजार विकसीत उस जाती असुन त्याचा देश विदेशात प्रसार सुरू असल्याचे बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले.शेतकी कार्यालयाशी संपर्क ठेवून सातत्याने नवनवीन मार्गाचा अवलंब शेतकऱ्यांनी केला पाहिजे.
  चालू हंगामात लक्ष गाठण्यासाठी ३०% कमी पडलो बऱ्याच गोष्टी आधुनिक केले आहेत स्टिम इकॉनॉमी व इतर बाबतीत पुढच्या वर्षी निश्चित चांगले धोरण ठरवू, कारखान्याच्या कामात व्यत्यय यावा यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांनी उपद्वयाप केले ते लवकरच शोधून त्यावर कारवाई करू असेही ते म्हणाले, मात्र यासाठी सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे अशा सूचना केल्या.
या कार्यक्रमांस संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, ज्येष्ठ नेते कृषिरत्न दत्तात्रय कोल्हे, सर्व संचालक, माजी सभापती शिवाजी वक्ते, मच्छिंद्र केकाण, सुनिल देवकर, अंबादास देवकर, बाजीराव मांजरे, संभाजी गावंड, अरूण येवले, शरद थोरात, दगुराव चौधरी, साहेबराव रोहोम, रिपाई नेते दिपक गायकवाड, जयराम गडाख, कामगार नेते मनोहर शिंदे, जि प माजी गटनेते  केशव भवंर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आजी माजी संचालक, उस उत्पादक सभासद शेतकरी, उसतोडणी वाहतुकदार, कंत्राटदार मोठया संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार  उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी मानले.
चौकट 
 साखर कारखान्यांचे आयकाराचे  दहा हजार कोटी माफ  केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार मंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखानदारी बद्दल घेतलेली भूमिका आणि धोरण याबद्दल त्यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले 
 

Leave a Reply

You cannot copy content of this page