माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या ९४ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम
Various programs on the occasion of the 94th birth anniversary of former minister Shri Shankarao Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 26 March24 ,09.00 Am By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शिंगणापूर येथे ३० कोटी ३० लाख रुपयांचे जलजीवन पाणी योजनेचे भूमिपूजन मा.आ.सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीचे संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा अँड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोहेगांव येथे सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले
शेतकरी सहकारी संघ ली.कोपरगाव यांच्या विद्यमाने आयोजित विभागिय शेतकरी संवाद मेळावा प्रसंगी संजीवनी उद्योग संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे
यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रसिद्धी हवामान तज्ञ पंजाबराव डख,अमूल्या ऍग्रोटेक राहुल मुगदुम यांचे मार्गदर्शन लाभले. ऊस पिकावर ड्रोन यंत्रा द्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक रवंदे येथे संपन्न झाले.
येसगाव येथे माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा सौ.रेणुका कोल्हे या उपस्थित होत्या.
येसगाव येथील दिव्यांग बांधवांना सौ.रेणुका कोल्हे यांचे हस्ते किराणा किटचे वितरण करण्यात आले.दिव्यांग हा समाजाचा अविभाज्य घटक आहे त्यांना सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून कार्य करण्याची स्व.कोल्हे साहेब यांची शिकवण आहे.
सहकार महर्षी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त १०१ गरजू कुटूंबात किराणा साहित्य वाटप माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.संजीवनी गेट येथे शिंगणापूर गावच्या युवकांनी एकत्रित येत हा अनोखा उपक्रम आयोजित केला
संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज ते स्टेशन रोड दरम्यान पंचायत समिती सदस्या सौ.सुनीता कैलास संवत्सरकर यांच्या निधीतून बसवण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटचे (पथदिवे)लोकार्पण स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.