गौतम पब्लिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेसाठी साठी राज्यातून  विद्यार्थी 

गौतम पब्लिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेसाठी साठी राज्यातून  विद्यार्थी 

Students from State for Gautam Public School Entrance Exam

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 27 March24 ,20.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कुल येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेसाठी राज्यातून विद्यार्थी आले होते अशी माहिती शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी दिली आहे.

निवासी शाळेमध्ये सोयी सुविधांच्या बाबतीत अव्वल असलेल्या गौतम पब्लिक स्कूल ने जपलेला शैक्षणिक दर्जा व क्रीडा क्षेत्रात असलेला दबदबा यामुळे  यावर्षी विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मोठी गर्दी केल्यामुळे संस्थेच्या सचिव सौ. चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ३ री ते ८ वी पर्यंतच्या प्रवेशासाठी “प्रवेश पात्रता परीक्षा” घेण्यात आली. मात्र या परीक्षेला देखील राज्यातील मुंबई, ठाणे, भिवंडी, सोलापूर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर, जालना,नांदेड,परभणी,सोलापूर,सांगली, सातारा,पुणे,धाराशिव आदी जिल्ह्यातील विद्यार्थी आले होते 

यावेळी  विद्यार्थ्यांनी  शाळेचा रम्य परिसर व विस्तीर्ण क्रीडांगण, स्विमिंग पूल आदी सुविधांबरोबरच रुचकर जेवणाचा आस्वाद घेवून प्रवेश निश्चित केला 

Leave a Reply

You cannot copy content of this page