शहरातील विकासकामासाठी   प्रशासनावर कोणाचाही  दबाव नाही ; गोसावी 

शहरातील विकासकामासाठी   प्रशासनावर कोणाचाही  दबाव नाही ; गोसावी 

There is no pressure on the administration for development work in the city; Gosavi

कोपरगाव : गेल्या एक ते सव्वा वर्षापासून कोपरगाव नगरपालिकेत मी प्रशासक तथा मुख्याधिकारी  म्हणून काम करत आहे.शहरातील विकास कामाबाबत  पालिका प्रशासन व मुख्याधिकारी म्हणून माझ्यावर कोणाचाही कुठलाही दबाव नाही, गोसावी यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ स्पष्ट केले. 

शहरातील विविध कामांच्या बाबत माजी आमदार यांच्याकडून  पालिका मुख्याधिकारी यांच्यावर दबाव आणला  जात असल्याच्या काळे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपावरून शहरात मोठे वादंग उठले आहे. यावरून  काळे कोल्हे या दोन्ही  गटांच्या  कार्यकर्त्यांमध्ये मध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगला असून पातळी घसरून जी राळ उडत आहे.
नेमके यामागील सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने थेट मुख्याधिकारी गोसावी यांच्याशी बातचीत केली,
यावर बोलताना प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी ,  कोणाकडून कधीही, कोणताही दबाव आलेला नाही. केलेल्या  आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.  माझ्यावर व पालिका प्रशासनावर कोणताही दबाव नाही  स्पष्टोक्ती  प्रतिनिधी जवळ दिली. 
  गोसावी यांनी शहरातील विविध विकास कामाच्या विषयावर  भाष्य केले. ते म्हणाले की, निवडणुकीचा कालावधी संपल्याने सभागृह बरखास्त झाले तेव्हापासून गेल्या सव्वा वर्षापासून प्रशासक म्हणून मी कोपरगाव शहराचा कारभार पाहत आहे सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे मलाच सर्व निर्णय घ्यावे लागतात या काळात शहर विकासाच्या कामांना गती देण्याचा मी प्रयत्न केला आहे या काळात मी कुठल्याही पक्षाची व गटाची बाजू न घेता त्रयस्थपणे काम करत आहे 
 मुख्याधिकारी गोसावी म्हणाले की  शहरातील काही कामे प्राधान्याने घ्यावीत  यासाठी  पालकमंत्र्याकडे  मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मला जे आदेश देतील  ती कामे केली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कोट

 शहरातील विकास कामाबाबत मुख्याधिकारावर आम्ही  दबाव  आणल्याचा  आरोप  सिध्द झाला तर आम्ही राजकारण सोडून देऊ आणि जर आरोप सिध्द झाले नाही तर    केवळ श्रेयासाठी आरोप करणाऱ्यांनी  राजकारण सोडावे असे जाहीर आव्हान पराग संधान  यांनी केले. विरोधकांनी केलेल्या  आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही.

Leave a Reply

You cannot copy content of this page