शिंगणापूर येथे  बांधकामाच्या आडोशाला  स्त्री जातीच्या अर्भकाचा मृतदेह सापडला  

शिंगणापूर येथे  बांधकामाच्या आडोशाला  स्त्री जातीच्या अर्भकाचा मृतदेह सापडला  

The body of a female infant was found by a construction worker in Shingnapur

 शिंगणापूर  येथिल घटना; अनैतिक प्रकारातून प्रकार घडल्याचा पोलिसांचा संशय…incident at Shingnapur; The police suspect that the incident took place in an unethical way…

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed 29 March24 ,21.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्यातील संजिवनी गेट, शिंगणापुर  येथे विजय बाबुलाल संघवी यांचे मालकिचे गट.नं.१०१/१ मधील शौचालय बांधकामाचे आडोश्याला,  स्त्री जातीचे अर्भक मृतदेह प्लॉस्टिक बरणीत कोंबलेल्या स्थितीत आढळून आला आहे. हा प्रकार मंगळवारी (२८) रोजी सकाळी  १०.५३ वाजेच्या सुमारास उघड झाला,

त्या ठिकाणी साफसफाई  करीत असताना हा प्रकार समोर आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व पंचनामा करून बरणी अर्भकाचा मृतदेह असलेली बरणी ताब्यात घेतली दरम्यान अनैतिक प्रकारातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे. सदर अर्भक हे  सात आठ दिवसापूर्वी बरणीत टाकल्याचे  असावे . बरणीत असल्यामुळे बाहेर वास आला नाही  अशी माहिती पोलिसांनी दिली  याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात पोलीस पाटील सौ.सविता प्रशांत आढाव, (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्भकाचा जन्म झाल्याचे उद्देश्यपुर्वक लपवुन ठेवले प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात भादवि कलम ३१८ प्रमाणे अधिण्यात आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पुंड हे करीत आहेत.
    

Leave a Reply

You cannot copy content of this page