शहराच्या रस्त्यांसाठी ४.६५ कोटीची प्रशासकीय मान्यता – आ.आशुतोष काळे

शहराच्या रस्त्यांसाठी ४.६५ कोटीची प्रशासकीय मान्यता – आ.आशुतोष काळे

4.65 crore administrative approval for city roads – A. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 30 March23 ,18.10 PmBy राजेंद्र सालकर

 कोपरगाव : कोपरगाव शहराच्या विविध रस्त्यांसाठी  ४.६५ कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

आ.आशुतोष काळे यांनी शहरातील अनेक मुख्य रस्त्यांना देखील निधी देवून नागरिकांना रस्त्याच्या येणाऱ्या अडचणी  दूर केल्या आहेत.कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी व कोपरगाव शहरातील रस्ते,शहर सुशोभीकरण, स्मशानभूमी विकास,शासकीय इमारती यासाठी आजपर्यंत १२ कोटी पेक्षा जास्त निधी दिला आहे.

 प्रभाग क्रमांक १४ मधील गोदावरी नदीवरील छोटा पूल ते मोहनीराज नगरचा मुख्य रस्ता डांबरीकरण करणे,नगरपरिषद हद्दवाढ भागातील गवारेनगर तारांगण शॉप ते यमुना बिल्डिंग ते सिनगर बिल्डिंग ते साई यमुना बिल्डिंग कॉर्नर ते रॉयल ड्रीम सिटी पर्यंत ७०० ते ८०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे,द्वारका नगरी यांची घरासमोरील काका कोयटे यांचे घरासमोरील सुतार लोहार कार्यालयापासून ते शंकर नगर मध्ये लोहार सर घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे,नगरपरिषद हद्दवाढ भागातील गवारेनगर भागात गवारे नगर भागात अनवर शेख घर ते कटारे घरापर्यंत ३०० ते ४०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ०१ मध्ये समता नगर भागात गायकवाड घर ते पाटोळे घरापर्यंत ५०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे,प्रभाग क्रमांक ०३ मध्ये महाजनगरते घर ते आर के इंजीनिअरिंग पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, हिराबाई लाड घर ते शिंदे घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक ०४ मध्ये वडांगळी वस्ती ते शेखर राहणे वस्ती पर्यंत ५०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे,प्रभाग क्रमांक ०४ मध्ये जाकीर भाई घर ते अमोल शर्मा घर डीपी रस्ता ४०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ०६ श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तहसील कार्यालय (बँक रोड)पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे, ढमाले ते आरशी कॉम्प्लेक्स पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, तसेच देवरे घर ते भुसारी घर रस्ता, सघवी घर ते  माळी बोर्डिंग पर्यंत पेविंग ब्लॉक बसविणे, टिळक नगर शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारील परिसर सुशोभीकरण करणे, जिओ ऑफिस ते संदीप किराणा पर्यंत रस्त्यास पेविंग ब्लॉक बसविणे,प्रभाग क्रमांक ०८ मध्ये बाळासाहेब संधान घरचे ते पठाण घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे,कडोसे घर ते संदीप पगारे घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये धारणगाव रोड श्रद्धा टॉवर्स ते सेवा निकेतन रोड पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे,लक्ष्मी नगर भागातील विविध गल्ल्यांमध्ये पेव्हींग ब्लॉक बसविणे, इंदिरापथ रोडवरील झवेरी हॉस्पिटल ते डॉ. नरोडे घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे,प्रभाग क्रमांक ११ मध्ये अंबिका मेडिकल ते दत्त मंदिर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,प्रभाग क्रमांक १२ मध्ये बबलू दुकळे घरटे जुबेदा आप्पा घर तसेच दीपक घाटे घर ते फौजीया घर ते मिटकर घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, तायरा आप्पा घर ते मोहम्मद शेख घर ते शरीफ शेख घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक १४ मध्ये पाखले घर ते पंडोरे वस्ती पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे आदी रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. या रस्त्यांच्या कामाच्या निधीला तांत्रिक मान्यता मिळाली असून लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल असे सांगितले

Leave a Reply

You cannot copy content of this page